शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
3
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
4
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
5
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
6
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
7
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
8
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
9
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
10
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
11
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
12
८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट
13
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
14
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
15
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
16
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
17
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
18
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
19
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
20
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 

पुरस्कार सोहळ्याकडे लागले सा:यांचे लक्ष

By admin | Updated: January 23, 2017 00:03 IST

निशा पाटीलचा आज गौरव : गावक:यांमध्ये आनंदाचे वातावरण, 31 रोजी काढणार मिरवणूक

भडगाव : निशा पाटीलचा बाल शौर्य पुरस्काराने गौरव होत असल्याने गावात आणि परिसरात आंनदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. गावाचे नाव देशपातळीवर तिने नेल्याने सर्वाची छाती अभिमानाने फुलली असून सर्वाचे डोळे या पुरस्कार वितरण सोहळ्याकडे लागले आहे.निशाने आगीतून लहान मुलीचा जिव वाचविला होता. या  धाडसाची नोंद घेत पंतप्रधानांच्या हस्ते 23  जानेवारी रोजी दिल्ली येथे निशाचा बाल शौर्य पुरस्काराने गौरव केला जाणार आहे. 26 जानेवारी रोजी राजपथावर होणा:या पथसंचलनातही निशा सहभागी होणार आहे. देशातील 25 बालकांना  बाल शौर्य पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. यात भडगावची निशा पाटील ही महाराष्ट्राची एकमेव वीरबाला आहे. यासाठी आदर्श कन्या विद्यालयाचा शिक्षकवर्ग, विद्यार्थिनींमध्ये आनंद पसरला आहे. निशाला बाल शौर्य पुरस्कार जाहीर होताच शाळेतील संचालक मंडळ, शिक्षक, विविध संघटनांनी तिचा सत्कार केला. यशवंतनगर जि.प. शाळेची ती माजी विद्यार्थिनी आहे.  दिल्लीला रवाना होण्यापूर्वी निशाचा जि.प.शाळेनेही सत्कार केला.  अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा कमल अहिरे होत्या. सूत्रसंचालन प्रमोद पाटील यांनी केले. संतोष महाजन, जगन्नाथ भोई, राजेंद्र पाटील, मुख्याध्यापक सुनील निकम व शिक्षक हजर होते.दरम्यान 31 जानेवारी रोजी आदर्श कन्या विद्यालयातर्फे तिची मिरवणूक काढली जाणार आहे असे विद्यालयाकडून सांगण्यात आले. (वार्ताहर)क्रीडा क्षेत्रातही कामगिरीनिशाचा स्वभाव शांत असून ती हुशार आहे. लहानपणापासून धाडसी आहे. क्रीडा क्षेत्रातही ती मागे नाही. तालुकस्तरीय क्रीडा स्पर्धेत 400 मीटर रनिंग, लांबउडीतही तिने चमकदार कामगिरी केली आहे. शेतात काम करुन शिकते निशानिशा पाटील हिची परिस्थिती गरिबीची आहे. वडील दिलीप गुलाब पाटील, आई किरण पाटील, दोन भाऊ असा परिवार आहे. शेतमजुरी करुन परिवाराचा उदरनिर्वाह  होतो. निशाही सुटीच्या दिवशी शेतात कामाला जाते व शिक्षणही घेत आहे.जिवाची पर्वा न करता वाचविले बालिकेला14 जानेवारी 2015 रोजी सकाळी 10 वाजता निशा  पाटील मैत्रिणीकडे आली असताना यशवंतनगरातील कस्तुराबाई  नथू देशमुख यांच्या घराला शॉर्टसर्किटने  आग लागली होती.  घरातील सदस्य मजुरीला गेल्याने घरात कुणीच नव्हते. यावेळी घरात झोक्यामध्ये सात महिन्याची पूर्वी देवकर देशमुख ही झोपली होती. तिचा रडण्याचा आवाज येताच निशाने जीवाची पर्वा न करता घरात घुसून आगीतून पूर्वी हिला सुखरुप बाहेर काढले होते. पूर्वीची आई मोठय़ा मुलाला शाळेत पोहचवण्यास गेली होती. देशमुख परिवाराने निशाच्या या धाडसाचे कौतुकही केले.