शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
3
इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप
4
आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?
5
"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
6
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
7
शाळेच्या गेटजवळ स्फोटके आढळली; १० वर्षाच्या विद्यार्थ्याने उचलून फेकलं आणि...
8
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
9
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
10
पाकिस्तान अनेक हवाई मार्ग करत आहे बंद! नेमकं कारण तरी काय?मोठे नियोजन सुरू असल्याची शक्यता
11
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला
12
२.९५ लाखांपर्यंतचा बंपर डिस्काउंट, Mahindra च्या 'या' ५ गाड्यांवर जबरदस्त ऑफर्स
13
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
14
राज्यसभेत उघडपणे बोलणारे आज गप्प का? धनखड यांच्या मौनावर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
15
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाला मोदक आवडतात; पण उकडीचे की तळणीचे? पद्म पुराणात सापडते उत्तर!
16
Vinod Kambli: बोलायला त्रास होतोय, चालताही येईना; विनोद कांबळींच्या प्रकृतीबद्दल चिंताजनक माहिती
17
कुमार बिर्ला स्वतःच्याच कंपनीचे शेअर्स स्वस्तात का विकत आहेत? एक वर्षापूर्वीच खरेदी; का आली अशी वेळ?
18
प्रसिद्ध अमेरिकन जज फ्रँक कॅप्रियो यांचे निधन; 'दयाळू न्यायाधीश' म्हणून होते लोकप्रिय!
19
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
20
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार

जळालेल्या ‘कोर्टा’ची वास्तू देतेय ‘ऑगस्ट क्रांती’ची साक्ष

By admin | Updated: May 19, 2017 12:24 IST

महात्मा गांधींनी ब्रिटीशांना ‘चले जाव’ म्हणताच देश पेटून उठला. त्यात अमळनेरही मागे नव्हते.

अतुल जोशी / ऑनलाइन लोकमतअमळनेर, जि. जळगाव, दि. 19 - अमळनेर शहराची ओळख केवळ संताची भूमी, शिक्षण पंढरी एवढीच मर्यादीत नाही तर क्रांतीकारकांचीही भूमी म्हणून शहर प्रसिद्ध आहे. महात्मा गांधींनी ब्रिटीशांना ‘चले जाव’ म्हणताच देश पेटून उठला. त्यात अमळनेरही मागे नव्हते. मातृह्यदयी सानेगुरूजींचा कणखर आदेश येताच स्वातंत्र्याच्या अग्नीकुंडात अनेकांनी उडय़ा घेतल्या. ऑगस्ट क्रांती येथेही घडली. येथील क्रांतीकारकांनी एका रात्रीतून टपाल कार्यालय, रेल्वेस्थानक व न्यायालयाच्या इमारतीची होळी केली. या जाळलेल्या वास्तुंपैकी आज फक्त माळीवाडय़ात असलेली ‘कोर्टा’ची वास्तू ऐतिहासिक क्रांतीची, शुरविरांच्या पराक्रमाची साक्ष देत भगAावस्थेत उभी आहे. 8 ऑगस्ट 1942 रोजी ब्रिटीश सरकारने आपली भारतातील सत्ता काढून घेण्याचा ऐतिहासिक ठराव कॉँग्रेसच्या कायदे मंडळाने संमत केला. ‘चलेजाव’ अशी घोषणा गांधीजींनी केली. त्या वेळी जनताही  स्वातंत्र्याच्या लढय़ात उतरली होती.असे असताना अमळनेर शांत होते. ही बाब सानेगुरूजींना सहन झाली नाही. त्यांनी  डॉ. उत्तमराव पाटील यांना चिठ्ठी लिहली.‘..अशा गंभीर प्रसंगी माझा खान्देश शांत का? अमळनेरची जनता जर काहीच करणार नसेल तर याच अमळनेरातील पाच कंदील समोर मी माङया शरीराची होळी करेल..’ गुरूजींचा संदेश अमळनेरकरांच्या ह्रदलाला भिडला. आंदोलनाचे नेतृत्व क्रांतीविरंगना लीलाताई उत्तमराव पाटील यांनी केले. लीलाताईंनी सभा घेतली. त्यात सानेगुरूजींचा संदेश वाचून दाखवला. 14 ऑगस्ट 1942 रोजी क्रांतीकारकांनी अमळनेरातील सरकारी कार्यालयांची होळी करण्याचा सपाटाच लावला. क्रांतीकारकांनी मामलेदाराच्या टांग्याची होळी केली. त्यानंतर टपाल कार्यालय जाळले. तेथून मोर्चा रेल्वस्थानकाकडे वळला. रेल्वे स्टेशन जाळून त्याचे स्मशान केले. क्रांतीकारक तेवढय़ावरच थांबले नाहीत  तेथून ते माळी वाडय़ातील कोर्टाकडे गेले. कोर्टाची  राख केली.पूर्वी ज्याठिकाणी मोकळे मैदान होते, तेथे आता नवीन टपाल कार्यालय आहे. तर रेल्वे स्थानकाचे नूतनीकरण झालेले आहे. पण माळीवाडय़ात त्याकाळी जाळलेले ‘कोर्ट’ भगAावस्थेत आजही इतिहासाची साक्ष देत उभे आहे. कोर्टाचीच दगडी चिरेबंदी आजही भक्कमपणे उभी आहे.स्वातंत्र्य संग्रामात अमळनेरकरांनी केलेल्या अमूल्य कामगिरीची साक्ष देत कोर्टाच्या विटांच्या भिंती उभ्या आहेत. हा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी तसेच ज्यांनी-ज्यांनी या क्रांतीपर्वात सहभाग घेतला त्यांची आठवण म्हणून किमान पुतळे तरी उभारले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त होवू लागली आहे.