शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
5
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
6
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
7
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
8
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
9
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
10
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
11
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
12
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
13
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
14
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
15
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
16
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
17
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
18
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
19
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
20
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
Daily Top 2Weekly Top 5

आयात शुल्काचा भार वाढवून स्वदेशीला चालना देण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:54 IST

लोकमत व्यासपीठ जळगाव : केंद्रीय अर्थसंकल्पात आरोग्यासाठी मोठ्या घोषणा करीत पायाभूत सुविधांसाठीही मोठ्या तरतुदी करण्यात आल्याने याद्वारे अप्रत्यक्षरीत्या सर्वच ...

लोकमत व्यासपीठ

जळगाव : केंद्रीय अर्थसंकल्पात आरोग्यासाठी मोठ्या घोषणा करीत पायाभूत सुविधांसाठीही मोठ्या तरतुदी करण्यात आल्याने याद्वारे अप्रत्यक्षरीत्या सर्वच क्षेत्राला लाभ होऊन रोजगार निर्मितीलाही वाव राहणार आहे, असा सूर केंद्रीय अर्थसंकल्पाविषयी विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून उमटला. विशेष म्हणजे आयात होणाऱ्या घटकांवर आयात शुल्क व कृषी अधिभार लावण्यात आल्याने यातून स्वदेशी वस्तूंची मागणी वाढून स्थानिक उद्योगांना चालना मिळेल, असा विश्वासही व्यक्त केला जात आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी १ रोजी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर यामधील घोषणांचा कोणत्या क्षेत्राला काय लाभ होणार, अपेक्षापूर्ती झाली की नाही, काय हवे होते यासंदर्भात ‘लोकमत’च्यावतीने २ फेब्रुवारी रोजी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते, त्या वेळी हा सूर उमटला. या वेळी जळगाव पीपल्स बँकेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील, क्रेडाईचे राज्य सहसचिव अनिश शहा, जिल्हा व्यापारी महामंडळाचे कार्याध्यक्ष सुरेश चिरमाडे, डॉ. महेंद्र काबरा, ‘कॅट’ संघटनेचे वरिष्ठ राज्य उपाध्यक्ष पुरुषोत्तम टावरी, जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सुनील भंगाळे, सचिव अनिल झवर, सहसचिव रूपेश चौधरी, कापड व्यावसायिक सुरेश हासवाणी, जळगाव सीए शाखेचे अध्यक्ष सागर पाटणी, उपाध्यक्ष प्रशांत अग्रवाल उपस्थित होते. लोकमतचे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी, सहायक महाव्यवस्थापक गौरव रस्तोगी यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

स्वतंत्र विभागामुळे लाभ

बँकांसाठी फारसे काही नसले तरी मल्टिस्टेट को. ऑप. सोसायटींसाठी स्वतंत्र विभागाची घोषणा केल्याने सुविधा वाढतील व संस्थांविषयीच्या निर्णयांना गती मिळेल. शिवाय संस्थांचे योग्य दिशेने काम होईल. कमी व्याजदरात उद्योगांना कर्ज मिळणार असल्याने बँकांनाही त्याचा लाभ होईल. जुन्या वाहनांच्या विल्हेवाटीविषयी घेतलेल्या निर्णयाने ऑटोमोबाइल क्षेत्राला लाभ होईल. सर्वसमावेशक अर्थसंकल्प असून गेल्या वेळी केलेले बदल या वेळीही कायम ठेवल्याने व कोरोनाचा भार न टाकल्याने सर्वांना त्याचा दिलासा आहे.

- भालचंद्र पाटील

अर्थव्यवस्थेला चालना मिळणार

बांधकाम क्षेत्राला या अर्थसंकल्पात थेट काही घोषणा नसल्या तरी पायाभूत सुविधा, आरोग्यासाठी केलेल्या तरतुदीचा अप्रत्यक्षरीत्या लाभ होणार आहे. पायाभूत सुविधांसाठी तरतुदी वाढविल्याने अर्थव्यवस्थेला चालना मिळून घरांकडे कल वाढून त्याचा बांधकाम क्षेत्राला लाभ होऊ शकतो. परवडणाऱ्या घरांसाठी करांच्याबाबतीत मर्यादा वाढविण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. बांधकाम क्षेत्राला मात्र अजूनही उद्योगाचा दर्जा मिळाला नाही. राज्य सरकारने मुद्रांक शुल्कात ज्या पद्धतीने सूट दिली तशी केंद्र सरकारने काही सूट दिली असती तर आणखी ‘बूस्ट’ मिळाले असते.

- अनिश शहा

सावळागोंधळ सुरूच

या अर्थसंकल्पाकडून सर्वसामान्यांना मोठ्या अपेक्षा होत्या. कररचनेबाबत स्पष्टता नसल्याने निराशा झाली आहे. जीएसटीमध्ये अनेक बदल केले जात असल्याने त्याचा व्यावसायिकांसह सर्वांना त्रास सहन करावा लागतो. यातील गुंतागुंत कमी करण्याचे सांगितले जात होते. मात्र यात अजूनही सावळागोंधळ सुरू आहे. कररचना सुटसुटीत हवी, मात्र तसे होताना दिसत नाही.

- सुरेश चिरमाडे