शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

माल जप्त केल्याचा संतापात हॉकर्सकडून मनपाचे ट्रॅक्टर जाळण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:11 IST

जळगाव : शहरातील मुख्य रस्त्यावर मनपा प्रशासनाने हॉकर्सला व्यवसाय करण्यास मज्जाव केला असल्याने आता हॉकर्स व मनपा कर्मचाऱ्यांमधील संघर्ष ...

जळगाव : शहरातील मुख्य रस्त्यावर मनपा प्रशासनाने हॉकर्सला व्यवसाय करण्यास मज्जाव केला असल्याने आता हॉकर्स व मनपा कर्मचाऱ्यांमधील संघर्ष वाढला आहे. शुक्रवारी शहरातील फुले मार्केट परिसरात हॉकर्सवर कारवाई करून, एका हॉकर्सचा माल जप्त केला म्हणून संतापाच्या भरात संबंधित हॉकर्सने मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाचे ट्रॅक्टर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने मनपा कर्मचाऱ्यांच्या हा प्रकार लक्षात आल्यामुळे हा प्रकार होण्याआधीच थांबविण्यात आला. या प्रकरणी संबंधित हॉकर्सवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेतील गर्दीवर नियंत्रण यावे म्हणून मनपा प्रशासनाने पुढील सहा महिने मुख्य रस्त्यालगत व फुले मार्केट परिसर नो हॉकर्स झोन तयार केला आहे. मात्र, याच भागात व्यवसाय होत असल्याने हॉकर्सदेखील मनपाच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून फुले मार्केट व परिसरात व्यवसाय करण्यावर ठाम आहेत. शुक्रवारी फुले मार्केटमध्ये अनेक हॉकर्सने दुकाने थाटायला सुरुवात केली होती. त्याचक्षणी मनपाचे पथक दाखल झाल्यामुळे हॉकर्सने आपला माल घेऊन दुकाने बंद करण्यास सुरुवात केली. त्यात काही हॉकर्सचा माल मनपाकडून जप्त करण्यात आला.

संतापाच्या भरात ट्रॅक्टरवर ओतले पेट्रोल

संबंधित हॉकर्सचा माल जप्त केल्यानंतर मनपा कर्मचाऱ्यांनी इतर हॉकर्सवर कारवाई करण्यास सुरुवात केल्यानंतर एका हॉकर्सने फुले मार्केटच्या मधोमध उभ्या असलेल्या ट्रॅक्टरवर पेट्रोल ओतायला सुरुवात केली. मात्र, याकडे मनपा कर्मचाऱ्यांचे कोणतेही लक्ष नव्हते, ट्रॅक्टरवर पेट्रोल ओतल्यानंतर ट्रॅक्टरचे ड्रायव्हर राजू वाघ यांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर संबंधित हॉकर्सला या ट्रॅक्टरला आग लावण्याआधीच आवर घातला. त्यात इतर मनपा कर्मचारी व पोलिसांनी हॉकर्सला ट्रॅक्टरपासून दूर नेऊन, वाद शांत करण्याचा प्रयत्न केला.

हॉकर्सला जबर मारहाण

आग लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या हॉकर्सला ट्रॅक्टरपासून दूर आणल्यानंतर संबंधित हॉकर्सच्या नातेवाइकांनी व इतर हॉकर्सनी त्याला जबर मारहाण केली. तसेच पोलिसांकडे सुपूर्त केले. दरम्यान, संबंधित हॉकर्स हा काही दिवसांपूर्वीच या भागात व्यवसाय करण्यासाठी आला असून, हॉकर्स संघटनेकडे याबाबतची कोणतीही नोंद नाही. संबंधित हॉकर्स हा स्थानिक नसल्याची माहिती हॉकर्स संघटनेचे अध्यक्ष नंदू पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली. दरम्यान, मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाकडून शुक्रवारी फुले मार्केट भागासह सुभाष चौक, बळीराम पेठ भागात रस्त्यालगत व्यवसाय करणाऱ्या १४ हॉकर्सवर कारवाई करण्यात आली असून, अनेकांचा मालदेखील जप्त केला आहे.