शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात लग्नाचे आमिष देवून मुलीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2017 12:01 IST

औद्योगिक वसाहत पोलिसांनी घेतले संशयिताला ताब्यात

आॅनलाईन लोकमत

जळगाव,दि.२५ -पंधरा वर्षीय मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करणाºया राहुल विजय चौधरी-वाघ (वय २४ रा.डी सेक्टर, प्लॉट क्र.२७, पंच रत्न अ‍ॅग्रो कंपनी, औद्योगिक वसाहत, जळगाव) याला एमआयडीसी पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केली. दरम्यान, या घटनेतील पीडित मुलीने आई-वडिलांकडे जाण्यास नकार दिल्याने तिची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली.
एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणाºया एका पंधरा वर्षीय मुलीशी राहुल याने प्रेमसंबंध प्रस्थापित करुन तिला लग्नाचे आमिष दाखवून १९ जून रोजी सकाळी ११ वाजता तिच्या घरुन पळवून नेले होते. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पीडित मुलीच्या आईने दुसºयाच दिवशी २० जून रोजी एमआयडीसी पोलीस स्टेशन गाठून निरीक्षक सुनील कुराडे यांच्याकडे घटना कथन केली. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन प्रथम अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर हा तपास सहायक निरीक्षक समाधान पाटील यांच्याकडे सोपविला.
प्रारंभी अपहरणाचा गुन्हा दाखल झाल्याने पोलिसांनी पीडितेची वैद्यकीय तपासणी केली. त्यानंतर राहुल याच्याविरुध्द बलात्कार व बाललैंगिक अत्याचाराचे वाढीव कलम लावण्यात आले. शनिवारी त्याला न्यायालयात हजर केले असता न्या.के.बी.अग्रवाल यांनी २७ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
मुलगी अल्पवयीन असल्याने अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. सहायक निरीक्षक समाधान पाटील व कॉन्स्टेबल भरत लिंगायत यांनी पीडित मुलगी व राहुल याचा शोध घेतला. नंतर दोघंही नांदुरा, जि.बुलडाणा येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार समाधान पाटील व लिंगायत यांनी राहुल याच्या बहीण व मेहुण्यांकडे चौकशी केली. गुन्हा करण्यात मदत केली म्हणून तुम्ही आरोपी होऊ शकतात, याची जाणीव दोघांना करून दिली. अटकेच्या भीतीने दोघांनी राहुल व मुलीची माहिती सांगितली व त्याचवेळी राहुलचा फोन नातेवाईकांना आला. त्यांनी आम्ही धोक्यात आहोत असे सांगून त्याला तातडीने घरी बोलावले. घरी येताच पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले.