शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

अासोद्यात जि. प. सदस्या पती पराभूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : तालुक्याचे लक्ष लागून असलेल्या आसोदा ग्रामपंचायत निवडणुकीत तीन पॅनलमध्ये सरळ लढत होऊन यात तुषार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : तालुक्याचे लक्ष लागून असलेल्या आसोदा ग्रामपंचायत निवडणुकीत तीन पॅनलमध्ये सरळ लढत होऊन यात तुषार महाजन यांच्या आसोदा विकास पॅनलने ८ जागांवर बाजी मारली आहे. यात प्रभाग सहामधून जि. प. सदस्या पल्लवी पाटील यांचे पती रवी देशमुख यांचा पराभव झाला आहे. त्यांच्या पॅनलला तीन जागा मिळाल्या आहेत. प्रभागात अरुण कोळी यांचा विजय झाला.

आसोदा येथे १७ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली होती. मोठी ग्रामपंचायत म्हणून सर्व तालुक्याचे या निवडणुकीकडे लक्ष लागून होते. या निवडणुकीत माजी सरपंच विलास चौधरी यांच्या नेतृत्वाखाली लोकमान्य पॅनलने १७, जि. प. सदस्या पल्लवी पाटील यांचे पती रवी देशमुख यांच्या नेतृत्वाखाली संभाजी आबा पाटील ग्रामविकास पॅनलचे १२ तर पंचायत समिती सदस्य तुषार महाजन यांच्या आसोदा विकास पॅनलचे १७ जागांवर उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. हे तीनही पॅनलप्रमुख निवडणूक रिंगणात होते. यात असोदा विकास पॅनलने ८ जागा जिंकल्या तर लोकमान्य पॅनलला ६ आणि संभाजी आबा पाटील ग्रामविकास पॅनलचे तीन उमेदवार निवडून आले आहेत. यात पॅनलप्रमुख रवी देशमुख यांचा अरुण कोळी यांनी २१९ मतांनी पराभव केला आहे. रवी देशमुख यांना ३९३ मते मिळाली.

आसोदा विजयी उमेदवार असे कंसात मिळालेली मते

प्रभाग १ : हेमंत धनंजय पाटील (५१९), जीवन नथ्थू सोनवणे (५८७), वैशाली भरत पाटील (६६२)

प्रभाग २ : महेंद्र रवींद्र जोहरे (१०८१), संजोग गलू कोळी (१०४८), लताबाई सुभाष महाजन (९०७)

प्रभाग ३ : तुषार रमेश महाजन (१०६२), वर्षा गिरीश भोळे (११२४),

प्रभाग ४ : विलास यशवंत चौधरी (५८५), शकुंतला रमेश महाजन (६९२), योगिता शरद नारखेडे(६२८)

प्रभाग ५ : सुनील बाळू पाटील (५१९), शंकुतला रमेश महाजन (४२९), सुवर्णा विलास चौधरी (४२१)

प्रभाग ६ : अरुण काशिनाथ कोळी (६१२), अनिता दिलीप कोळी(६०९), मंगला विजय भोळे (५५५)

दोन्ही प्रभागात विजय

शंकुतला रमेश महाजन यांनी प्रभागात ४ आणि ५ मध्येही विजय मिळविला आहे. त्यांना अनुक्रमे ६९२ आणि ४२९ मते या प्रभागांमध्ये मिळाली आहे. दरम्यान, आता त्यांना एका प्रभागातून राजीनामा द्यावा लागणार असून यापैकी कोणत्याही एका प्रभागात पोटनिवडणूक होण्याची चिन्हे आहेत.