शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळात सशस्त्र दरोड्याचा प्रयत्न फसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:12 IST

भुसावळ : शहरात तलवार, चेन व चाकूच्या धाकावर जबरी चोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या तिघा चोरट्यांच्या शहर पोलिसांनी मुसक्या आवळल्या. ...

भुसावळ : शहरात तलवार, चेन व चाकूच्या धाकावर जबरी चोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या तिघा चोरट्यांच्या शहर पोलिसांनी मुसक्या आवळल्या. ताब्यात घेतलेल्या संशयितांपैकी एक अल्पवयीन असून शहर पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तापी पुलावर मंगळवारी रात्री काही संशयित जबरी चोरीच्या उद्देशाने आल्याची माहिती शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांना मिळाली. त्यांनी सहाय्यक फौजदार मोहंमदअली सैयद, इकबालअली सैयद, हेडकॉन्स्टेबल सुपडा पाटील आणि कॉन्स्टेबल सचिन काटे यांना तापी पुलावर कारवाईसाठी पाठविले. यावेळी पोलिसांनी पुलाच्या दोन्ही बाजूस उभे असलेल्या लोकांची तपासणी केली. पोलिसांनी आणखी पुढे जाऊन तपासणी केली. त्यात पुलाजवळ काळ्या रंगाची मोटारसायकल (एमएच-१९-डीआर-५१५०) जवळ उभ्या असलेल्या तीन तरुणांपैकी दोन मुले अचानक फैजपूरच्या दिशेने पळू लागले, तर एक मुलगा मोटारसायकल सुरू करून पळू लागला. तेव्हा पोलिसांनी पाठलाग करून त्यांना पकडले. त्यांच्याकडे तलवार, लोखंडी चेन आणि चाकू आढळला. यावेळी पोलिसांनी शुभम शेखर पाटील (वय १८, रा. अकलूज, ता.यावल), रा. रामचरण गुप्ता (वय १९, रा. अकलूज, ता. यावल), तर पाडळसा, ता. यावल येथील एक अल्पवयीन मुलगा अशा तिघांच्या मुसक्या आवळल्या.

पोलिसांनी केलेल्या चौकशीत हे तिन्ही जण चोरी करण्यासाठी भुसावळात येत असल्याचे सांगण्यात आले. जाकीर हारून मन्सुरी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयितांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.