शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

मोकाट श्वानांच्या निर्बीजीकरणासाठी ‘पशू’ने घेतला पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:13 IST

जळगाव : शहरात मोकाट श्वानांचा उपद्रव सुरू आहे. दरवर्षी पिसाळलेल्या श्वानांच्या चाव्यामुळे, अनेकांना प्राण गमवावे लागतात किंवा रेबिजपासून वाचण्यासाठी ...

जळगाव : शहरात मोकाट श्वानांचा उपद्रव सुरू आहे. दरवर्षी पिसाळलेल्या श्वानांच्या चाव्यामुळे, अनेकांना प्राण गमवावे लागतात किंवा रेबिजपासून वाचण्यासाठी अनेक इंजेक्शन टोचून घ्यावे लागतात, असे होत असताना सुद्धा मनपा प्रशासनाकडून निर्बीजीकरणासाठी उपाययोजना केली जात नाही. अखेर मोकाट श्वानांच्या निर्बीजीकरणासाठी ‘पशु अ‍ॅनिमल प्रोटेक्शन’ ही संस्था सरसावली आहे.

शहरातील अनेक भागांत अधूनमधून पिसाळलेल्या श्वानाकडून हल्ल्याचे प्रकार घडत असतात. आजवर त्यात कित्येक बालके व नागरिक जखमी झाले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून श्वानांवर निर्बीजीकरण शस्त्रक्रिया करणे मनपाने बंद केले आहे. दुसरीकडे गल्लीबोळात मोकाट फिरणाऱ्या श्वानांमुळे शहरवासीयांना जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागते. श्वानांचे प्रजनन कमी व्हावे, यासाठी आता शहरातील पशू अ‍ॅनिमल प्रोटेक्शन संस्थेच्या टीममध्ये शस्त्रक्रिया करण्यासाठी दोन डॉक्टरसुद्धा आहेत. महाबळ, डीएसपी चौक, गुजराल पेट्रोलपंप परिसरातील सात ते आठ मोकाट श्वानांवर ही शस्त्रक्रिया आतापर्यंत करण्यात आली आहे.

संस्थेचे सदस्य करतात श्वानांचा सांभाळ

मोकाट श्वानांवर शस्त्रक्रिया झाल्यावर संस्थेतील एका सदस्याकडून त्यांचा सांभाळ केला जात असतो. पाच दिवस त्यांच्यावर उपचार केले जाते. प्रकृती ठणठणीत होताच, पुन्हा त्या श्वानांना जेथून आणले, त्या भागात सोडून दिले जाते. या मोहिमेसाठी पशू संस्थेच्या अध्यक्ष खुशबू श्रीश्रीमाळ, कोमल श्रीश्रीमाळ, भवानी अग्रवाल, अनुज अग्रवाल, हर्षल भाटिया, डॉ. जय राजपुत, अभिषेक जैन, तेजू आर्या, प्रिन्स महाजन, कल्याणी वाघ, दीपांशू दोषी, भूमिका मंत्री, गुंजन पाटील, हर्षल भाटिया आदी परिश्रम घेत आहेत.