शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

गौताळा अभयारण्य, पाटणादेवी जंगलात 23 निरीक्षण केंद्राद्वारे प्राणी गणना

By admin | Updated: May 10, 2017 15:42 IST

गौताळा अभयारण्य व पाटणादेवी जंगल परिसरात 10 रोजी बुद्ध पौर्णिमाच्या पर्वावर सकाळी 11 वा प्राणी गणनेला सुरुवात झाली. विशेष म्हणजे ही गणना 11 रोजी सकाळी 11 र्पयत म्हणजे 24 तास चालणार आहे.

 चाळीसगाव, दि.10- शहराच्या दक्षिणेला अवघ्या 18 कि.मी. अंतरावर असणा-या गौताळा अभयारण्य व पाटणादेवी जंगल परिसरात 10 रोजी बुद्ध पौर्णिमाच्या पर्वावर सकाळी 11 वा प्राणी गणनेला सुरुवात झाली. विशेष म्हणजे ही गणना 11 रोजी सकाळी 11 र्पयत म्हणजे 24 तास चालणार आहे. यासाठी जंगलात गस्तीसाठी 23 निरीक्षण केंद्रे उभारण्यात आले असून वनविभागाच्या कर्मचा-यांसह एकुण 92 निसर्ग प्रेमी गणनेत सहभागी झाल्याची माहिती चाळीसगाव वन्यजीव विभागाचे वनक्षेत्रपाल एल.एम.राठोड यांनी लोकमतशी बोलतांना दिली.

26 हेक्टर जंगल परिसर 
गौताळा अभयारण्याचे 20 हजार तर पाटणादेवी परिसरातील 6 हजार अशा 26 हजार हेक्टर परिसरातील जंगलव्याप्त भागात प्राणी गणना करण्यात येत आहे. यात 23 ठिकाणी निरीक्षण केंद्रे उभारली आहेत. प्रत्येक केंद्रावर वनविभागाचा एक कर्मचारी व तीन निसर्गप्रेमी यांचा सहभाग आहे. गणनेत सहाय्यक वनपाल पी.व्ही.जगत, वनपाल आर.बी.शेटे, मानद वन्यजीव संरक्षक व सर्पमित्र राजेश ठोंबरे, वनपाल, वनसंरक्षक, वनमजुर यांच्यासह निसर्गप्रेमींचा समावेश आहे. 
पाणवठय़ांवर विशेष लक्ष
पाटणादेवी जंगल परिसरात विपुल प्राणी संपदा असून वनोषौधींसह दूर्मिळ वनस्पतींही येथे आढळतात. बिबटय़ा, तडस, लांडगे, कोल्हे, निलगाय, ससे, माकड, मोर, रानडुक्कर आदी प्राण्यांचा हजारोच्या संख्येने रहिवास आहे. प्राण्यांची गणना करतांना बहुतांशी निरीक्षण पॉईंट पाणवठय़ानजीक तयार केले गेले आहे. प्रत्यक्ष व प्राण्यांच्या पावलांच्या ठश्यांवरून गणना करण्यात येत असल्याची माहिती राजेश ठोंबरे यांनी दिली. 
मोठी अन्नसाखळी, कृत्रिम पाणवठेही
गेल्या काही वर्षात पाटणादेवी जंगल परिसरात प्राणी संगोपनासाठी विशेष लक्ष दिले जात आहे. रात्रीची गस्त वाढवून वृक्षतोड व प्राणी शिकारीला पूर्णपणे आळा घातला गेला आहे. याचे चांगले दृश्य  परिणाम दिसून येत आहे. गेल्या काही वर्षात प्राण्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. गेल्या वर्षी पर्जन्यमान चांगले झाल्याने जंगलात अन्नसाखळीही विपुल प्रमाणात असून वनविभागाने कृत्रिम पाणवठेही तयार केले आहेत. गेल्या चार ते पाच वर्षात पर्यटकांच्या संख्येतही वाढ झाली असून वन्यजीव अभ्यासक आणि विदेशी पर्यटकांच्या भेटीही वाढल्या आहेत.