रावेर : खान्देशी केळीला पर्याय असलेल्या आंध्रप्रदेशातील व सोलापूर जिल्ह्यातील केळी उत्पादकांचा केळीचा हंगाम कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये संपुष्टात आल्याने रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर केळीची आखाती राष्ट्रात व सबंध देशभरातही केळीच्या मागणीत वाढ झाली आहे. खान्देशी केळीला देशभरात कुठल्याही केळीचा पर्याय आता उपलब्ध नसल्याने खान्देशी केळीला सुगीचे दिवस येवू घातले आहे. लॉकडाऊनमध्ये संधीसाधू व जास्त नफेखोरीच्या हव्यासापोटी पिळवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांनी पतझड केलेली केळीच आता हुकूमी एक्का ठरणार असल्याचे चित्र सुखावणारे ठरले आहे.कोरोनाच्या महामारीत उत्तर भारतात वाढती मागणी असतांना काही कथित व्यापाºयांनी कृत्रिम मंदीचे चित्र रंगवून दररोज दोनशे ते अडीचशे ट्रक भरून केळी उत्तर भारतात रवाना करून ‘अभी नही तो कभी नही ’ या उक्तीप्रमाणे अक्षरश: शेतकºयांची आर्थिक लूट केली. किराणा, भाजीपाला, फळभाज्या विक्रेते त्या उक्तीला अपवाद ठरण्यासारखे चित्र कोणत्याही शहरात व ग्रामीण भागात दिसले नाही.मात्र प्रशासनानेही दुर्लक्ष केल्याची शोकांतिका आहे.चालली अनागोंदीसबंध देशभरात केळीचा पुरवठा करणाºया खान्देशी केळीला पर्याय म्हणून स्वस्त दरातील आंध्रप्रदेशातील केळी उपलब्ध होती. म्हणून खान्देशात प्रसारमाध्यमांनी उठवलेला आवाजही कथित केळी व्यापाºयांसाठी मात्र जणूकाही ‘रात्रीचा गोंधळचं’ वाटल्याची अनुभूती जनसामान्यांनी घेतली. तब्बल महिनाभराच्या या लॉकडाऊनमध्ये केळी व्यापाºयांनी चालवलेल्या अनागोंदीला शासन, प्रशासन, केळी उत्पादकांच्या संघटना व स्वत: केळी उत्पादक शेतकरी लगाम घालण्यात अपयशी ठरले.आता खान्देशी केळीलापर्याय नाहीखान्देशी केळीला पर्याय म्हणून स्वस्त दरातील आंध्रप्रदेशातील केळीचा बागायतीचा हंगाम आटोपल्याने व सोलापूर जिल्ह्यातील केळीची निर्यात संपुष्टात आल्याने, खान्देशी केळीशिवाय सबंध देशभरात कुठेही पर्याय उपलब्ध नाही. त्यातच आखाती देशात व सबंध देशभरातही रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर केळीची वाढती मागणी असल्याने व बाजारपेठेत अजून आंबा वा द्राक्ष आपले पाय टिकवू न शकल्याने सद्यस्थितीत खान्ेदशी केळीला सुगीचे दिवस येण्याचे संकेत प्राप्त झाले आहेत.निर्यातीस झाली सुरुवातआखाती राष्ट्रात गुणात्मक दर्जाच्या केळी निर्यातीसाठी तांदलवाडी व अटवाडे येथील केळी निर्यातदार कंपनीकडून केळी निर्यातीला आरंभ झाला असून, स्थानिक बाजारपेठेत आता केळीची मागणीही वाढल्याने बाजार समितीने घोषीत केलेल्या केळी बाजारभावात अर्थात किमान ६०० ते ७०० रूपये प्रतिक्विंटल दरात केळीमालाच्या खरेदीला तालूक्यात आरंभ झाल्याची चर्चा आहे.
आंध्र प्रदेशातील हंगाम संपल्याने खान्देशी केळी ठरणार हुकमी एक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 20:11 IST