वरणगाव, ता. भुसावळ : येथील गंगाधर सांडू चौधरी विद्यालयात माजी सैनिक तथा विद्यालयाचे माजी विद्यार्थी कैलास त्र्यंबक माळी (सेवानिवृत्त नायक भारतीय सेना) यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच विद्यालयाचा माजी विद्यार्थी शेख कयूम शेख फयुम (बी.एस.एफ. ) यांचा शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष संदीप मधुकर चौधरी, सचिव किशोर झोपे, सहसचिव शरद चौधरी, संचालक बाळकृष्ण धनगर, संचालिका ज्योती अवतारे, माजी प्राचार्य सी. एस. अवतारे, आर. आर. महाजन सेवानिवृत्त शिक्षक एस.टी. जावळे, प्राचार्य एस एल नेमाडे, पर्यवेक्षक बी. ए. पाटील, प्राथमिक विद्यामंदिराच्या मुख्याध्यापिका संगीता चौधरी, इंग्लिश प्रायमरी स्कूलचे मुख्याध्यापक सोनवणे व सर्व सहकारी हजर होते.