शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
3
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
4
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
5
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
6
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
7
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
8
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
9
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
10
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
11
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
12
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
13
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
14
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
15
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
16
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
17
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
18
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
19
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
20
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा

विमानतळ प्रकरणात न्यायालयात दोषारोपपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 11:05 IST

प्रदीप रायसोनी यांच्यासह सात जणांचा समावेश

ठळक मुद्देआज हजर राहण्याबाबत पोलिसांनी बजावले समजपत्र; न्यायालयात कागदपत्रांची पडताळणी

जळगाव :विमानतळ योजनेतील गैरव्यवहार व अनियमितता प्रकरणी दाखल गुन्ह्याच्या दोषारोपाची गुरुवारी न्यायालयात पडताळणी करण्यात आली. या प्रकरणातील संशयित प्रदीप ग्यानचंद रायसोनी, सिंधू विजय कोल्हे यांच्यासह सात जणांना शुक्रवारी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी वर्ग १ यांच्या न्यायालयात हजर राहण्याचे समजपत्र बजावण्यात आले आहे.एक आठवडा आधी समजपत्रया गुन्ह्याचे तपासाधिकारी तथा अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी या गुन्ह्यातील संशयितांना एक आठवडा आधीच जामीनदारासह न्यायालयात हजर राहण्याबाबत समजपत्र बजावले आहे. सकाळी ११ वाजता हजर राहण्याचे त्यात नमूद केले आहे. ऐनवेळी धावपळ नको म्हणून बच्छाव यांच्या तपास पथकातील सहायक पोलीस निरीक्षक विजय देशमुख यांनी गुरुवारी न्यायालयात दोषारोपपत्राची कागदपत्रे सादर केली. सायंकाळी उशिरापर्यंत या कागदपत्रांची पडताळणी सुरु होती.सिंधू कोल्हे यांनी आजारपणाचे कागदपत्रे केली सादरया गुन्ह्यातील संशयित माजी नगराध्यक्षा सिंधू विजय कोल्हे यांनी समजपत्र मिळाल्यानंतर तपासाधिकाऱ्यांकडे आजारपणाचे कागदपत्रे सादर केली आहेत. गेल्यावेळी देखील कोल्हे यांनी आजारपणाचे कागदपत्रे सादर केली होती.सर्व संशयितांना जामीन मिळाल्यानंतर काही दिवसांनी त्या न्यायालयात हजर झाल्या होत्या.२०१२ मध्ये दाखल होता गुन्हातत्कालिन नगरपालिकेतर्फे विमानतळ योजना राबविताना ३ कोटी १८ लाख रुपयांचा गैरव्यवहार व अनियमितता झाल्याची तक्रार तत्कालिन नगरसेवक नरेंद्र भास्कर पाटील यांनी दिल्यावरुन २०१२ मध्ये जळगाव शहर पोलीस स्टेशनला भाग ५, गु.र.नं.११०/२०१२ भादवि कलम ४०३, ४०६, ४०९, ४२० व ३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. तत्कालिन नगरपालिकेचे उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष असलेले प्रदीप ग्यानचंद रायसोनी, नगराध्यक्ष सिंधू विजय कोल्हे, लक्ष्मीकांत तुकाराम चौधरी, चत्रभूज सोमा सोनवणे, मुख्याधिकारी पंढरीनाथ धोंडीबा काळे, धनंजय दयाराम जावळीकर व अ‍ॅटलांटा कंपनीचे संचालक राजू ए.बरोत यांच्याविरुध्द हा गुन्हा दाखल झाला होता.

टॅग्स :Courtन्यायालय