शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
4
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
5
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
6
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
7
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
8
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
9
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
10
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
11
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
12
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
13
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
14
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
15
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
16
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
17
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
18
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
19
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
20
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

औताला नातू व मुलाला जुंपणा:या बळीराजाला कृषीविभागाचा मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2017 17:36 IST

लोकमत वृत्ताची दखल : कृषी अधिका:याच्या प्रयत्नाने रतनलाल बाफना यांनी दिली बैलजोडी

अशोक परदेशी/ऑनलाईन भडगाव, दि.2 - भडगाव तालुक्यातील निंभोरा येथील शेतकरी हिरामण सुखदेव पाटील यांनी पैशाअभावी शेतीच्या मशागतीसाठी औताला नातू आणि मुलाला जुंपल्यानंतर संकटात सापडलेल्या बळीराजाला कृषी विभागाने मदतीचा हात पुढे करीत बैलजोडी उपलब्ध करून दिली आहे.भडगाव तालुक्यातील निंभोरा येथील शेतकरी हिरामण सुखदेव पाटील या शेतक:याने गरीबीमुळे  परिवारातील सदस्यांच्या मदतीने वखर ओढत कपाशीची कोळपणी केली. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांच्या प्रयत्नाने जळगावच्या रतनलाल सी. बाफना यांच्या गोशाळेतून या शेतक:याला 40 हजार रुपयाची बैलजोडी नुकतीच  देण्यात आली.हिरामण पाटील (वय 72) यांचेकडे 1 एकर 37 गुंठे जमीन आहे. शेतीच्या कामासाठी बैलजोडीसाठी पैसे कोठून आणावे हा प्रश्न होता. यामुळे ते मुलगा प्रल्हाद व नातू उमेशसह स्वत: वखर ओढून कपाशीची वखरणी, आंतरमशागत, कोळपणीचे काम करायचे.  यामुळे कोळपणी व निंदणीचा दोन्हीचा खर्चही वाचत असे. तर बैलजोडीसाठी कर्ज घेतल्यास परिवाराचा गाडा कसा चालणार? असा प्रश्न त्यांच्यासमोर होता. त्यामुळे ते स्वत: प्रचंड मेहनत घेत होते.  ते पत्नी, मुलगा, सून, दोन नातू असा परिवार असून  नातू उमेश हा पाचवीत शिकत आहे. या लहानशा  शेतात विहीर असून  कपाशीला ते ठिबक सिंचनने पाणी देतात.अखेर बैलजोडी मिळाली..‘ते स्वत:च ओढताहेत वखर’ असे वृत्त प्रसिध्द करुन  शेतक:याची ही  व्यथा ‘लोकमत’ने मांडली  होती. जिल्हा कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी या वृत्ताची दखल घेत निंभोरा येथे 30 जून रोजी शेतक:याची भेट घेवून पाहणी केली. सोबत  तालुका कृषी अधिकारी ए.व्ही.जाधव,  उपसंचालक जिल्हा अधीक्षक अनिल भोकरे, कृषी पर्यवेक्षक  मनोज सैंदाणे, कृषी सहायक अनिल देशमुख आदी उपस्थित होते. यानंतर  सोनवणे यांनी शाकाहारचे प्रणेते रतनलाल बाफना यांचेकडे शेतक:याची ही व्यथा मांडली. बाफना यांनी उदारतेने  40 हजार रुपयाची बैलजोडी या शेतक:यास घरपोच पोहचवली. तसेच कृषी विभागातर्फे अर्धे पोते ढेप व अर्धा पोते  मोफत दिले.  शासनस्तरावर याची दखल गेली नाही परंतु जिल्हा कृषी विभाग अधिका:यांच्या  प्रयत्नाने हिरामण पाटील यांच्या कुटुंबास अखेर बैलजोडी मिळाली.