शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

अखेर अमळनेर पोलीस निरीक्षकाची उचलबांगडी

By admin | Updated: February 18, 2017 00:32 IST

एमपीडीएची कारवाई न करणे भोवले : वादग्रस्त प्रकरणांची अपर पोलीस अधीक्षकांकडून चौकशी

जळगाव : अमळनेर येथील नगरसेवक घनश्याम उर्फ  श्यामकांत जयवंतराव पाटील (वय 31) याच्यावर बुधवारी जिल्हाधिका:यांनी एमपीडीएची कारवाई करून स्थानबद्धतेचे आदेश दिले होते. मात्र, ते आदेश बजावण्यापूर्वी  आरोपी  पसार झाला. याप्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ़ जालिंदर सुपेकर यांनी अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास वाघ यांची नियंत्रण कक्षात बदली केली आह़े तसेच त्यांच्या वादग्रस्त प्रकरणांच्या चौकशींचे आदेश अपर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांना देण्यात आले आहेत़ दरम्यान, त्यांचा तात्पुरता पदभार सहायक पोलीस निरीक्षक उदय साळुंखे यांच्याकडे दिला आहे.जिल्हा परिषद निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर श्यामकांत पाटील याच्यावर एमपीडीएची कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिका:यांनी 15 रोजी दिले होते. त्यानंतर अमळनेर पोलिसांनी त्याला स्थानबद्ध करून नाशिक कारागृहात रवानगी केल्याची माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयाला दिली. मात्र, प्रत्यक्षात त्यांनी पाटील याला स्थानबद्ध केले नसल्याचे उघड झाले. त्यामुळे अमळनेर पोलिसांनी खोटी माहिती पुरवल्याचे गुरुवारी निष्पन्न झाले                होत़े याप्रकरणी अमळनेरचे डीवाय.एस.पी. रमेश पवार यांनी चौकशी करून पोलीस अधीक्षकांकडे अहवाल पाठविला. त्यानुसार डॉ़ सुपेकर यांनी शुक्रवारी पोलीस निरीक्षक वाघ यांची नियंत्रण कक्षात बदली केली़ नगरपालिका निवडणूक काळात अमळनेरात दंगल झाली होती़ वाद झाल्यानंतरही त्याची खबरदारी घेण्यात पोलिसांनी हलगर्जीपणा केला होता़ यानंतर डॉक्टर मुलाच्या अपहरणाची घटना घडली होती़ यासह इतर पोलीस निरीक्षक विकास वाघ यांच्या वादग्रस्त प्रकरणांची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश अपर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांना दिले आह़े या अहवालानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असेही पोलीस अधीक्षक डॉ़ सुपेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितल़े