शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

अभाविप प्रदेश मंत्री सिद्धेश्वर लटपटे यांचे शहरात जोरदार स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:16 IST

जळगाव : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, महाराष्ट्र प्रदेश ५५ वे प्रदेश अधिवेशन नुकतेच पिंपरी चिंचवडमध्ये पार पडले. ...

जळगाव : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, महाराष्ट्र प्रदेश ५५ वे प्रदेश अधिवेशन नुकतेच पिंपरी चिंचवडमध्ये पार पडले. प्रदेश अधिवेशनामध्ये २०२१-२२ साठी अभाविप अध्यक्ष म्हणून प्रा.सारंग जोशी व प्रदेश मंत्री सिद्धेश्वर लटपटे यांची निवड करण्यात आली.

अभाविप महाराष्ट्र प्रदेश मंत्री सिद्धेश्वर लटपटे यांचे गुरुवारी सकाळी शहरात आगमन झाले. यावेळी जळगाव शाखेच्या वतीने ढोल ताशा, फटाके वाजवत फुलांचा वर्षाव करत स्वागत करण्यात आले. यावेळी महापौर भारती सोनवणे यांनी प्रदेश मंत्री सिद्धेश्वर लटपटे यांचे स्वागत केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला हार घालून रॅलीची सुरुवात करण्यात आली. या रॅलीची सांगता अभाविप कार्यालय नवीपेठ या ठिकाणी करण्यात आली. यावेळी नवनिर्वाचित महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रा.मनीष जोशी, शोध कार्य प्रदेश प्रमुख प्रा. केतन नारखेडे, आयाम प्रदेश प्रमुख प्रा.भूषण राजपूत, विद्यार्थिनी कार्य प्रदेश प्रमुख प्रतिमा याज्ञीक , शुभम भोलाणे, आदेश पाटील, रितेश महाजन, केशव पाटील, गौरवी चौधरी, सारंग पाटील, हिमानी महाजन, राजू पावरा, ज्ञानेश्वर उद्देवाल उपस्थित होते.