शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

‘रेमंड’मधील अपहारप्रकरणी 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

By admin | Updated: February 14, 2017 01:10 IST

फसवणूक : पोलिसांनी मागविले 12 वर्षाचे रेकॉर्ड

जळगाव : खोटे दस्ताऐवज तयार करुन कामगार हिताच्या 78 लाख रुपयांचा वेळोवेळी गैरवापर व अपहार केल्याप्रकरणी रेमंड कंपनीतील कामगार उत्कर्ष सभेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सेक्रेटरी व संचालक मंडळाविरुध्द न्यायालयाच्या आदेशाने एमआयडीसी पोलीस स्टेशनला फसवणूक, अपहार, गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये अध्यक्ष दिलीप उखा महाजन (वय 46 रा.आसोदा, ता.जळगाव), उपाध्यक्ष दिवाकर कडू चौधरी (वय 45, रा.तिवारी नगर, जळगाव), सेक्रेटरी तुषार किरण राणे (वय 32 रा.सालबर्डी, पो.कोथळी, ता.मुक्ताईनगर), सुनील डिगंबर फालक (वय 52 रा.लक्ष्मी नगर, जळगाव), अनिल विष्णू पाटील (वय 45 रा.आयोध्या नगर, जळगाव), नवल पौलाद पाटील (वय 44 रा.सावित्री नगर, जळगाव), दिलीप काशिनाथ वराडे (वय 33 रा.काहूरखेडा, ता.भुसावळ) व किरण चिंतामण भारंबे (वय 45 रा.श्रध्दा कॉलनी, जळगाव) यांचा समावेश आहे. या सर्वाविरुध्द 156 (3) प्रमाणे कलम 420, 465, 468, 471, 120 (ब) 34 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याचा तपास करुन अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने 8 फेब्रुवारी रोजी दिले आहेत. या गुन्ह्याचे तपासाधिकारी सहायक निरीक्षक समाधान पाटील यांनी 2004 ते 2016 या 12 वर्षातील व्यवहाराचे सर्व कागदपत्रे संस्थेकडून मागविले आहेत.या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी कधीपासून केली जात होती. अखेर न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, पोलिसांनी आज पंचनामाही केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.