शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

२१ वाळू गटातून ७०,२८६ ब्रास वाळू उत्खननासाठी उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:16 IST

जळगाव : जिल्ह्यातील २७ पैकी २१ वाळू गटांच्या लिलावाला राज्याच्या पर्या‌वरण समितीने हिरवा कंदील दाखविल्यानंतर या २१ वाळू गटांमधून ...

जळगाव : जिल्ह्यातील २७ पैकी २१ वाळू गटांच्या लिलावाला राज्याच्या पर्या‌वरण समितीने हिरवा कंदील दाखविल्यानंतर या २१ वाळू गटांमधून ७० हजार २८६ ब्रास वाळू उत्खननासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या वाळू गट लिलावासाठी २८ कोटी ६४ लाख ८५ हजार ७३६ रुपये हातची किंमत ठरविण्यात आली आहे.

गेल्या वर्षभरापासून वाळू गटांचे लिलाव रखडले होते. त्यात कोरोनामुळे पर्यावरण समितीचीही बैठक होत नव्हती. अखेर गेल्या आठवड्यात ही बैठक झाली व जिल्ह्यातून पाठविण्यात आलेल्या २७ वाळू गटांपैकी २१ वाळू गटांना मंजुरी देण्यात आली.

यामध्ये रावेर, चोपडा, अमळनेर, धरणगाव, एरंडोल व जळगाव तालुक्यातील गटांचा समावेश आहे. सर्वाधिक आठ वाळू गट रावेर तालुक्यातील असून त्या खालोखाल एरंडोल तालुक्यातील पाच, धरणगाव तालुक्यातील तीन, जळगाव व अमळनेर तालुक्यातील प्रत्येकी दोन व चोपडा तालुक्यातील एका वाळू गटाचा समावेश आहे.

महसूल वाढविण्यावर राहणार भर

यंदा गौण खनिज वसुलीच्या उद्दीष्टात गेल्या वर्षाच्या तुलनेत दीडपट वाढ करण्यात आली आहे. गेल्या वर्षी ७० कोटी उद्दीष्ट असलेल्या जिल्ह्यासाठी यंदा १०५ कोटी रुपयांचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. यात ज्या २१ वाळू गटांचे लिलाव होणार आहे, त्यांची हातची किंमत २८ कोटी ६४ लाख ८५ हजार ७३६ रुपये ठरविण्यात आली आहे.