शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

मराठा समाज मोर्चात जळगाव जिल्ह्यातील 70 हजार जणांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 17:22 IST

नियोजन बैठकीतही जळगावचा सहभाग : आरक्षणाबाबत अपेक्षा पूर्ती न झाल्याने निराशा

ठळक मुद्देनियोजनाच्या बैठकीत जळगावकरांचा समावेशआरक्षणाच्या मुद्यावरून नाराजीजळगावच्या बॅनरखाली हजारोंचा सहभाग

जळगाव : आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी बुधवारी मुंबई येथे काढण्यात आलेल्या मराठा समाजाच्या ऐतिहासिक मूकमोर्चात जळगाव जिल्ह्यातील 60 ते 70 हजार समाजबांधव सहभागी झाले होते. विशेष म्हणजे मोर्चाच्या पूर्वसंध्येला मुबंई येथे झालेल्या नियोजन बैठकीतही जळगावच्या शिष्टमंडळाला निमंत्रित करण्यात आले होते.  तब्बल 57 मोर्चे काढून सुद्धा मराठा समाजाच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने 9 ऑगस्ट क्रांती दिनी मुंबई येथे मराठा समाजाचा  मूक मोर्चा काढण्यात आला. यामध्ये सहभागी होण्यासाठी जळगाव जिल्ह्यातून मराठा समाज बांधव रेल्वे, बसेस्, खाजगी वाहने याद्वारे मुंबईत धडकले. यामध्ये प्रा. डी.डी. बच्छाव, डॉ. राजेश पाटील, विनोद देशमुख, किरण बच्छाव, माजी उप महापौर किशोर पाटील, महेश पाटील, दीपक सूर्यवंशी, मिलिंद सोनवणे, रवींद्र पाटील, संजय पवार, अॅड. विजय पाटील, राजेश पाटील, अनिल भाईदास पाटील, प्रशांत पवार, सचिन सोमवंशी, महेश पाटील, पराग घोरपडे, अरविंद निकम, रमेश पाटील यांच्यासह जिल्हाभरातील तब्बल 60 ते 70 हजार समाजबांधव या मोर्चात सहभागी झाले. यामध्ये जळगाव शहरातील 15 ते 16 हजार समाजबांधवांचा सहभाग होता. सकाळी 11 वाजता भायखळा येथून मोर्चाला सुरुवात झाली, पुढे हा मोर्चा अण्णासाहेब पाटील पूल, खडापारसी, इस्माईल मचर्ंट चौक, जे. जे. उड्डाणपूलमार्गे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ओलांडून आझाद मैदानात विसर्जित झाला. यामध्ये सुरुवातीपासून अखेर्पयत जळगावकर सक्रीय सहभागी झाले. 

जळगावच्या बॅनरखाली हजारोंचा सहभाग‘मराठा क्रांती मोर्चा, जळगाव जिल्हा’ असा उल्लेख असलेल्या एका भव्य बॅनरखाली जळगाव येथील समाजबांधव या मोर्चात सहभागी झाले होते. 

आरक्षणाच्या मुद्यावरून नाराजीसमाजाच्या इतर मागण्या मान्य करण्यात आल्या तरी आरक्षणाबाबत निर्णय न झाल्याने अपेक्षाभंग झाल्या असल्याच्या प्रतिक्रिया जळगावकरांनी व्यक्त केल्या. 

नियोजनाच्या बैठकीत जळगावकरांचा समावेशमोर्चाच्या पूर्वसंध्येला मंगळवारी दादर येथील शिवाजी मंदिरात मराठा मोर्चासंदर्भात नियोजन बैठक झाली. यामध्ये जळगावचे प्रा. डी.डी. बच्छाव, डॉ. राजेश पाटील, विनोद देशमुख, सचिन सोमवंशी, दीपक सूर्यवंशी आदींचा समावेश होता.