शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
4
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
5
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
6
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
7
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
8
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
9
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
10
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
11
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
12
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
13
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
14
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
15
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
16
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
17
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
18
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
19
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा

66 यात्रेकरूंची ‘स्वर्गारोहिणी’वर स्वारी

By admin | Updated: May 20, 2017 00:55 IST

जळगाव : हिमालयातील खडतर अध्यात्मिक यात्रेला प्रथमच मोठय़ा प्रमाणात जाणार भाविक

जळगाव :  हिमालय पर्वतरांग ही मानवासाठी या पृथ्वीतलावरील सर्वात अद्भुत व विलक्षण निर्मिती म्हटली जाते. या हिमालय पर्वतरांगेत असलेल्या अतिकठीण अशा ‘स्वर्गारोहिणी’वर (अर्थात स्वर्गावर स्वारी)  जळगावातून 66 यात्रेकरू स्वारी करणार आहेत.  स्वर्गारोहिणीवर एवढय़ा मोठय़ा प्रमाणात जाणारे हे पहिलेच पथक असेल.  जळगावच्या सिद्धी व्यंकटेश देवस्थानच्या वतीने या स्वर्गारोहिणी यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. कैलास मानसरोवर आणि बद्रीनाथ यात्रा ह्या सर्वात कठीण यात्रा समजल्या जातात. त्यापेक्षाही कितीतरी कठीण ही स्वर्गारोहिणी यात्रा मानली जाते.   जाण्या-येण्यासाठी अतिशय खडतर, सारखे चढाव आणि उताराचे मार्ग असलेल्या या स्वर्गारोहिणीवर फारच कमी भाविक जात असतात. कारण तिथले हवामान बदलत असते. एवढे असले तरी ही देवभूमी निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे.  रोमांचक आणि आध्यात्मिक अनुभूतीचे शिखरबिंदू असलेली ही यात्रा आहे. एकाच वेळी हिमकडे, हिमनदी, धबधबे, कुरणे, जंगल आणि पर्वत शिखरे पाहण्याचा आणि अनुभवण्याचा हा एक मार्ग आहे. 29 मे रोजी जळगावहून हे भाविक हरिद्वार एक्स्प्रेसने स्वर्गारोहिणीकडे प्रयाण करतील. यात जळगाव जिल्ह्यासह पुणे, कराड, सोलापूर, सातारा, अहमदनगर, बडोदा,  हैदराबाद, मुंबई, नागपूर, सुरत आणि औरंगाबाद येथील भाविक सहभागी होणार आहेत.     5 जून  रोजी निजर्ला एकादशी आहे. या दिवशी भाविक चक्रतीर्थ सरोवरात स्नानाचा आनंद घेतील.  आतार्पयत अनेक भाविक येथे गेले आहेत. पण एवढय़ा मोठय़ा प्रमाणात स्वर्गारोहिणीवर भाविक प्रथमच जात आहेत.या भाविकांसोबत 46 पिट्ट (कामगार) व सहा गाईडची व्यवस्था करण्यात आली आहे. 10 जणांना एक गाईड दिला जाणार आहे. प्रत्येकाला आठ किलो साहित्य सोबत नेता येईल. या यात्रेसाठी देवस्थानच्या वतीने राज्य सरकार, वनविभाग, प्रदूषण महामंडळ आणि भारतीय सैन्याचीही परवानगी घेण्यात आली. हे  यात्रेकरू 10 जून रोजी जळगावात परत येतील, अशी माहिती देण्यात आली. काय आहे स्वर्गारोहिणी..स्वर्गारोहिणीबाबत फारच कमी लोकांना माहिती आहे. रामायण काळात रावणाने स्वर्गाकडे जाणारा पूल तयार केला होता. त्यासाठी 14 पाय:यांची निर्मिती केली होती. यातील सात पाय:या अजूनही आहेत. यातील फक्त चार पाय:यांचे दर्शन होते. याशिवाय अवतार समाप्तीच्या वेळी पाचही पांडव याच मार्गाने स्वर्गाकडे गेले होते. पांडवांपैकी धर्मराज युधिष्ठिर हे स्वर्गारोहिणीर्पयत पोहचले होते, अशी आख्यायिका सांगितली जाते. बद्रीनाथ मंदिराच्या मागे 39 किलोमीटर अंतरावर पर्वतरांगांमध्ये स्वर्गारोहिणी हे तब्बल 20,512 फूट अर्थात 6252 मीटर उंचीवर आहे.  हे अंतर भाविकांना पायदळ आणि पायवाटेपेक्षा कमी जागेवर चालून पार करायचे आहे.