शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

पाटणादेवी जंगलात आढळले ६ बिबटे

By admin | Updated: May 11, 2017 19:20 IST

शहराच्या दक्षिणेला १८ कि.मी. अंतरावर असणा-या गौताळा अभयारण्य व पाटणादेवी जंगल परिसरात प्राणी गणनेत ६ बिबटे आढळले असून गत वर्षाच्या तुलनेत यंदा

चाळीसगाव (जि. जळगाव) : शहराच्या दक्षिणेला १८ कि.मी. अंतरावर असणा-या गौताळा अभयारण्य व पाटणादेवी जंगल परिसरात प्राणी गणनेत ६ बिबटे आढळले असून गत वर्षाच्या तुलनेत यंदा विविध प्राण्यांच्या संख्येत जवळपास दुपटीने वाढ झाली आहे. १० रोजी बुद्ध पौर्णिमाच्या पर्वावर सकाळी ११ वा. प्राणी गणनेला सुरुवात झाली होती. जवळपास २४ तास ही गणना चालली.यासाठी जंगलात गस्तीसाठी २३ निरीक्षण केंद्रे उभारण्यात आले होती. वनविभागाचे १५ कर्मचारी व ५० निसर्गप्रेमी गणनेत सहभागी झाले होते. यावेळी तीन बिबटे, एक मादी व दोन पिले आढळले तर इतर प्राण्यामध्ये जवळपास दुपटीने वाढ झाली आहे. बोढरे येथे एक, ओढरे येथे एक, जुनोने येथे एक असे तीन बिबटे दिसून आले. जुनोने पाझर तलावावर रात्री ११.२० ते दीड वाजेदरम्यान एक मादी व दोन पिले आढळली. मादीने दोन्ही पिल्लांना आंघोळ घातली. पिले मादीभोवती काही वेळ फिरत होती असे दृष्यही दिसून आले. दरम्यान आणखी ४ ते ५ बिबटे या जंगलात असल्याचा अंदाज असून त्यांचे दर्शन मात्र गणनेत होवू शकले नाही. याचवेळी तडस, लांडगे, कोल्हे, निलगाय, ससे, माकड, मोर, रानडुक्कर ,ऊदमांजर, सायाळ, हरीण, भोकर, काळवीट आदी प्राणीही दिसून आले. गोताळा वन्यजीव, आॅट्रम घाटाचे वन्य संरक्षक पी.व्ही.जगत, चाळीसगाव वन्यजीव विभागाचे वनक्षेञपाल एल.एम.राठोड, वनपाल आर.बी.शेटे, मानद वन्यजीव संरक्षक व सर्पमित्र राजेश ठोंबरे आदींचा गणनेत मुख्य सहभाग होता.