शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

५२ नगरसेवकांना वसुलीची नोटीस

By admin | Updated: January 4, 2017 00:35 IST

घरकुलसह, मोफत बससेवा व इतर योजनांच्या अंमलबजावणीत पालिकेचे ६० कोटी ३२ लाखाचे नुकसान झाले होते.

 

जळगाव : तत्कालीन नगरपालिकेने शहरात राबविलेल्या घरकुलसह, मोफत बससेवा व इतर योजनांच्या अंमलबजावणीत पालिकेचे ६० कोटी ३२ लाखाचे नुकसान झाले होते. यातील रक्कमेच्या वसुलीसाठी आजी-माजी नगरसेवकांना आता पुन्हा नोटीस बजावण्याची प्रक्रिया बुधवार ४ पासून सुरू होत आहे. नोटीस न स्विकारणाºयांच्या घरावर ती डकविली जावी असे आदेश मनपा प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. तत्कालीन पालिकेने शहरात गरीबांना मोफत घरकूल देण्याची योजना, मोफत बससेवा, पेव्हर ब्लॉक, विमानतळ या सारख्या विविध योजना राबविल्या होत्या. या योजनांमध्ये अनियमिततेचा आरोप झाल्यानंतर शासनाने दोन समित्या नेमुन चौकशी केली होती. या चौकशीत पालिकेच्या ६० कोटी ३२ लाखाच्या आर्थिक नुकसानीला पालिकेतील तत्कालीन नगरसेवक  जबाबदार असल्याचा ठपका ठेवण्यात आला होता व ही रक्कम त्या नगरसेवकांकडून वसूल केली जावी म्हणून अहवाल देण्यात आला होता. ५२ नगरसेवकांचा समावेश२०१३ मध्ये तत्कालीन आयुक्त संजय कापडणीस यांनी ५२ नगरसेवकांना घरकुल प्रकरणात १ कोटी १६ लाखाच्या वसूलीची व मोफत बस सेवा योजनेत सुमारे ५ लाखाच्या जवळपास रकमेच्या वसुलीच्या नोटीस बजावल्या होत्या. या विरूद्ध नगरसेवकांनी न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायालयाने वसूलीच्या कारवाईस स्थगिती दिली होती. गेल्या  २३ डिसेंबरला ही स्थगिती न्यायालयाने उठविल्याने आता मनपा प्रशासनाकडून पुन्हा कारवाईस सुरूवात करण्यात आली आहे. वेगवेगळे निकष याप्रश्नी आयुक्तांनी दोन दिवसांपूर्वी नोटीसा बजावण्याची कारवाई करण्याचे आदेश आस्थापना विभागास दिले होते. त्यानुसार दोन दिवसांपासून कुणाला कोणती नोटीस द्यायची याबाबत छाननी सुरू होती. यात पूर्वी ज्यांनी नोटीसा स्विकारल्या त्यांना केवळ स्मरण नोटीस, ज्यांनी स्विकारल्या नाही त्यांना पूर्वीप्रमाणेच मुळ वसूलीची नोटीस देण्याच्या सूचना आहेत. जे नगरसेवक नोटीस स्विकारणार नाहीत त्यांच्या दरवाजावर ती डकविली जावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत. दोन विभागांना दिली जबाबदारी महापालिकेत गेल्या दोन दिवसांपासून काही जणांची नोटीसा तयार करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यानुसार आज दोन प्रकारच्या या नोटीस तयार झाल्या आहेत. आता बुधवारपासून महापालिकेतील बांधकाम व नगरसचिव विभागामार्फत या नोटीस बजावण्याचे आदेश देण्यात आले आहेत.