शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

५० हजार विद्यार्थी कोरोनाने ठेवले संगणकीय प्रमाणपत्रापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:17 IST

जळगाव : कोरोनाच्या संसर्गाने सर्वच क्षेत्रावर घाला घातला आहे. त्यातच शैक्षणिक क्षेत्रातील संगणक शिक्षणावरही याचा परिणाम दिसून आला आहे. ...

जळगाव : कोरोनाच्या संसर्गाने सर्वच क्षेत्रावर घाला घातला आहे. त्यातच शैक्षणिक क्षेत्रातील संगणक शिक्षणावरही याचा परिणाम दिसून आला आहे. जिल्ह्यातील जवळपास ५० हजार विद्यार्थी यावेळी संगणक शिक्षणाचे एमएससीआयटी ही प्रमाणपत्र परीक्षा देऊ शकले नाही व शिक्षणच बंद असल्याने शिक्षण घेऊही शकले नाही. हे प्रमाणपत्र सरकारी नोकरी करताना राज्य शासनाने अनिवार्य केले आहे. त्यातच जे सरकारी कर्मचारी अजूनही एमएस-सीआयटी उत्तीर्ण होऊ शकले नाही. त्यांचीही संधी हुकली आहे.

एमकेसीएलमार्फत एमएससीआयटीचे ज्ञान संगणक प्रशिक्षण केंद्रातून दिले जाते. आता तर संगणकावरील टायपिंगही सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे टायपिंग शिकण्याचे वय झालेल्या युवकांची कोरोनामुळे टायपिंग हुकली आहे. टायपिंग हे सुद्धा सरकारी नोकरी असो वा इतर नोकऱ्यांमध्ये आवश्यक ठरत आहे. सध्या डिजिटल शिक्षणामुळे संगणकाचे शिक्षण घेणे आवश्यक आहे. सर्व व्यवहारच संगणकाच्या माऊसवर व की बोर्ड वर सुरू झाले आहे. त्यामुळे संगणकीय ज्ञान मिळवणारे विविध अभ्यासक्रमही पूर्णतः बंद आहेत. जे विविध अभ्यासक्रम शिकल्यानंतर अनेक युवकांचा रोजीरोटीचा मार्ग गवसतो किंवा उपलब्ध तरी होतो.

परिणाम भविष्यात युवकांना जाणवणार

दरवर्षी किमान एमएससीआयटीचे सात सत्र होतात. मात्र २० मार्च २०२० पासून संगणकीय ज्ञान देणाऱ्या केंद्रांची कवाडेच बंद झाली आहेत. त्याचा परिणाम भविष्यात युवकांना जाणवणार आहे. दहावी, बारावीच्या परीक्षेची चर्चा होते. त्याच पद्धतीने या केंद्रांच्या परीक्षेचीही आता चर्चा होऊ लागली आहे. शैक्षणिक वर्षात दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी घरीच बसून ऑनलाईन अभ्यास करत असताना त्यांना संगणक प्रशिक्षणाचा जोड अभ्यासक्रम घरी बसून करता आला नाही.

१५० हून अधिक संगणक प्रशिक्षण केंद्र

जळगाव जिल्ह्यात जवळपास १५० हून अधिक संगणक प्रशिक्षण केंद्र आहे. दरवर्षी किमान ३० ते ५० हजार विद्यार्थी एमएससीआयटीची परीक्षा देतात. या परीक्षेत जवळपास चांगला निकालही लागतो. सरकारी नोकरीसाठी हे शिक्षण आवश्यक असल्याने प्रशिक्षण केंद्र हाऊसफुल्ल असतात. आता हे केंद्र शहरी भागातच नाहीतर निमशहरी आणि ग्रामीण भागातही सुरू करण्यात आलेले आहे. त्यामुळे गरीब असो वा सर्वसामान्य व्यक्ती हा कोर्स आवश्यक करत आहेत. त्यातच बँक व वाणिज्य कामासाठी टॅलीचे प्रशिक्षणही कामाचे असल्याने तो सुद्धा कोर्स केला जात आहे. संगणकावर जाहिराती बनवणे, फलक, बॅनर तयार करण्यासाठी डिटीपीचा कोर्स आवश्यक असतो. त्याचेही ज्ञान मिळविण्यासाठी युवकांचा प्रतिसाद असतो हे सर्व शिक्षण बंद असल्याने मोठे नुकसान युवकांचे झाले आहे

वर्षभरापासून संगणक केंद्र बंद आहे. मात्र, दुकानभाडे, वीज बिल, मेंटेनन्स हे सुरूच आहे. त्यामुळे आता आर्थिक गणित बिघडले आहे. तसेच कोरोनामुळे जिल्ह्यातील पन्नास हजार विद्यार्थी एमएचसीआयटीची परीक्षा देऊ शकले नाही. यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे.

- तिलोत्तमदास बोंडे, संगणक केंद्र चालक