शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याच्या ५० टक्के रुग्ण जळगाव शहरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:19 IST

जळगाव : जिल्ह्यात सोमवारी कोरोनाचे ४२ नवे रुग्ण आढळून आले. त्यापैकी २१ रुग्ण हे एकट्या जळगाव शहरात आढळून आले ...

जळगाव : जिल्ह्यात सोमवारी कोरोनाचे ४२ नवे रुग्ण आढळून आले. त्यापैकी २१ रुग्ण हे एकट्या जळगाव शहरात आढळून आले आहेत. शहरातील रुग्णवाढ थांबत नसल्याचे गंभीर चित्र असून पुन्हा एका बाधित महिलेच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, सोमवारी पुन्हा एकदा कमी चाचण्या झाल्याचे समोर आले आहे.

सोमवारी केवळ ८५ ॲन्टीजन चाचण्या करण्यात आल्या असून त्यात २ जण बाधित आढळून आले आहेत. हे दोघेही जळगाव शहरातील आहे. दरम्यान, आरटीपीसीआरचे ३६७ अहवाल प्राप्त झाले असून त्यात ४० बाधित समोर आले आहेत. तर सोमवारी आरटीपीसीआरच्या केवळ १४२ तपासण्या करण्यात आल्या आहेत. लसीकरणाच्या धावपळीत कर्मचारी कमतरतेमुळे चाचण्या घटविण्यात आल्याचे एक चित्र समोर येत आहे. जळगाव शहरातील एका ७९ वर्षीय महिलेच्या मृत्यूची नोंद आहे. मृतांची संख्या १३४५ झाली असून यात शहरातील २९३ मृत्यू आहेत. शहरातील आशाबाबा नगर २, गणपती नगर, मोहाडी रोड, संभाजी नगर, सागर पार्क, एमआयडीसी या भागात प्रत्येकी १ रुग्ण आढळून आले आहेत.

गोलाणी मार्केटमध्ये आजपासून तपासणी

शहरातील गोलाणी मार्केटमध्ये मोबाईल व्यापारी, भाजी विक्रेते, या ठिकाणी काम करणार्यांची चाैथ्या मजल्यावर कोरोना चाचणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर उपायुक्त संतोष वाहुळे आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पाटील यांनी प्रत्येक दुकानात जावून विक्रेत्यांना कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन केले. ही चाचणी सकाळी १० ते २ या वेळेत केली जाणार आहे