जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि नानासाहेब यशवंतराव नारायणराव चव्हाण कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय चाळीसगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विद्यापीठस्तरीय आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन शिबिरात सहभागी झालेल्या ४२ रासेयो स्वयंसेवकांनी चाळीसगाव तालुक्यातील पाच गावांमध्ये स्वच्छता, रस्तेदुरुस्ती, श्रमदान करून पूरग्रस्तांच्या वेदना समजून घेत त्यांना मानसिक आधार देण्याचा प्रयत्न केला. या चारदिवसीय शिबिराचा समारोप मंगळवारी झाला.
४ ते ७ सप्टेंबर या कालावधीत चाळीसगाव तालुक्यातील पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचा समारोप संस्थेचे सचिव अरूण निकम यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप पाटील, प्रतिभा चव्हाण, योजनाताई पाटील, प्राचार्य डॉ. एस. आर. जाधव, विद्यापीठ रासेयो संचालक डॉ. पंकजकुमार नन्नवरे, डॉ. प्रशांत कसबे, उपप्राचार्य डॉ.एस.बी. महाजन, डॉ. जी.डी. देशमुख, डॉ. आर.पी. निकम, डॉ.ए.एल. सूर्यवंशी, डॉ.यू.पी. नन्नवरे उपस्थित होते.
दु:ख समजून घेत पूरग्रस्तांना दिला मानसिक आधार
प्राचार्य डॉ. जाधव यांनी रासेयो स्वयंसेवकांनी वाकडी, बायपास रोड ते पाटणा, पिंपरखेड तांडा, वाघडू या गावांमध्ये केलेल्या कामांचे कौतुक केले. आपल्या भाषणात दिलीप पाटील यांनी पूरग्रस्तांना रासेयोच्या विद्यार्थ्यांनी जो धीर दिला, तो कौतुकास्पद असून निसर्गावर कोणीही मात करू शकत नाही. मात्र, त्यांना मदतीचा हात दिला जाऊ शकतो, असे मत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात अरुण निकम यांनी श्रमदान आणि सेवाभाव यातूनच समाजाचा व देशाचा विकास होईल, असे प्रतिपादन केले. चार दिवसांच्या या शिबिरात स्वयंसेवकांनी या गावामध्ये स्मशानभूमीची स्वच्छता, रस्तेदुरुस्ती, नालेसफाई, गाळ आणि कचरा काढणे आदी श्रमदान करून पूरग्रस्त आदिवासी बांधवांच्या व शेतक-यांच्या भेटी घेऊन त्यांचे दु:ख समजून घेत मानसिक आधार देण्याचा प्रयत्न केला. प्रास्ताविक, संचालक डॉ. पंकजकुमार नन्नवरे यांनी केले. डॉ. आर.पी. निकम यांनी सूत्रसंचालन केले, डॉ.ए.एल. सूर्यवंशी यांनी आभार मानले.
या शिबिरासाठी डॉ.एम.बी. पाटील, उपाध्यक्ष डॉ.संजय देशमुख, सहसचिव संजय पाटील तसेच प्राचार्य डॉ. एस.आर. जाधव, प्रा. मंगला सूर्यवंशी, प्रा. एच.आर. निकम, प्रा. के.पी. रामेश्वरकर, ए.बी. सूर्यवंशी, एम.एस. कांबळे, मंगेश देशमुख, रावसाहेब त्रिभुवन, राजू गायकवाड, कैलास चौधरी आदींनी सहकार्य केले.