शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यात सक्रिय रूग्ण '४००'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:20 IST

जळगाव : जिल्ह्यात कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विविध उपाययोजना राबविल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून ...

जळगाव : जिल्ह्यात कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विविध उपाययोजना राबविल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहेत. सद्य:स्थितीत जिल्ह्यातील सक्रिय रुग्णसंख्या ४०० पर्यंत खाली आली आहे. जिल्ह्यातील बारा तालुक्यांमध्ये सक्रीय रुग्णसंख्या तीसच्या आत आली असून जळगाव शहरातील रुग्णसंख्या ४४, भुसावळ ३८, जामनेर ३० तर चाळीसगाव तालुक्यातील रुग्णसंख्या ७९ इतकी आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या दिवसेंदिवस कमी होणे ही दिलासादायक बाब असून सर्वांनी नियमांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

कोरोनाच्या दुस-या लाटेत जळगाव जिल्ह्यात सक्रीय रुग्णसंख्या १२ हजाराच्या जवळपास पोहोचली होती. मात्र कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी प्रशासनाने राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार प्रभावी उपाययोजना राबवून कोरोनाचा संसर्ग रोखण्यात यश मिळविले आहे. प्रशासनाने राबविलेल्या विविध उपाययोजनांमुळे जिल्ह्यात कोरोनाच्या दुस-या लाटेत १२ हजारपर्यंत गेलेली सक्रीय रुग्णसंख्या झपाट्याने कमी झाली असून ती आता ४०० पर्यंत खाली आली आहे.

केवळ चाळीसगावात सक्रीय रूग्ण अधिक

कोरोनाच्या दुस*या लाटेत जळगाव शहर, भुसावळ, चोपडा या तीन ठिकाणी सक्रीय रुग्णसंख्या हजाराच्यावर गेली होती तर उर्वरित तालुक्यात सक्रीय रुग्णसंख्या पाचशे ते हजाराच्या जवळपास पोहोचली होती. मात्र सध्या जिल्ह्यातील पंधरा तालुक्यांपैकी चौदा तालुक्यात सक्रीय रुग्णसंख्या ही पन्नासच्या आत आली असून एकमेव चाळीसगाव तालुक्यात ही रुग्ण संख्या ७९ इतकी आहे.

तालुकानिहाय उपचार घेत असलेले रुग्ण

जळगाव शहर-४४, जळगाव ग्रामीण-२२, भुसावळ-३८, अमळनेर-१२, चोपडा-२०, पाचोरा-२०, भडगाव-०५, धरणगाव-२५, यावल-२०, एरंडोल-२५, जामनेर-३०, रावेर-२०, पारोळा-२१, चाळीसगाव-७९, मुक्ताईनगर-१०, बोदवड-०५ व इतर जिल्ह्यातील-०४ असे एकूण ४०० रुग्ण उपचार घेत आहेत. यापैकी २६५ रुग्ण लक्षणे असलेले तर १३५ रुग्ण हे लक्षणे नसलेले आहेत. सध्या जिल्ह्यात रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.९१ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे.