शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
3
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
4
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
5
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
6
Latest Marathi News LIVE: कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे नोएडामधील सेक्टर क्र. ५९, ६० आणि ६२ मधील कारखान्यातील काम ठप्प
7
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
8
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
9
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
10
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
11
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
12
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
13
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
14
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
15
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
16
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
17
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
18
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
19
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
20
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
Daily Top 2Weekly Top 5

मेगाब्लॉकच्या पहिल्या दिवशी ४० टक्के काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:14 IST

दिवसभरात सिंग्नल यंत्रणेचे ४० टक्के काम भुसावळ रेल्वे प्रशासनातर्फे सध्या जळगाव ते भादलीदरम्यान तिसऱ्या रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे. ...

दिवसभरात सिंग्नल यंत्रणेचे ४० टक्के काम

भुसावळ रेल्वे प्रशासनातर्फे सध्या जळगाव ते भादलीदरम्यान तिसऱ्या रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे. शुक्रवारी सकाळी मेगाब्लॉकच्या या कामाला सुरूवात झाली. या मेगा ब्लॉकच्या काळात जळगाव रेल्वे स्टेशनच्या हद्दीत काही ठिकाणी सिग्नल यंत्रणेत बदल तर काही ठिकाणी नवीन सिग्नल यंत्रणा टाकण्यात येत आहे. तर या नविन सिग्नल यंत्रणेवरून सुरत मार्गाकडे जाणाऱ्या गाड्या ‘टर्मिनेट’ होण्यासाठी अद्ययावत यंत्रणा उभारण्यात येत आहे. शनिवारी सायंकाळी आठपर्यंत हे काम चालणार आहे. दरम्यान, या मेगाब्लॉकमुळे रेल्वे स्टेशनच्या हद्दीतुन जाणाऱ्या सर्व गाड्या ताशी ३० किमी वेगाने अर्थात अत्यंत संथ गतीने धावल्या.

इन्फो :

कर्मचाऱ्यांनी पार पाडली सिग्नल यंत्रणेची भुमिका

रेल्वे प्रशासनातर्फे सिग्नल यंत्रणेच्या कामासाठी जळगाव रेल्वे स्टेशनच्या हद्दीत, साधारणत : दोन किलोमीटर पर्यंत सिग्नल यंत्रणा बंद ठेवण्यात आली होती. या दोन किलोमीटरच्या रेड सिग्नल दाखवून, सिग्नल यंत्रणा पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे या ठिकाणी रेल्वेचे कर्मचाऱ्यांनी ठिकठिकाणी उभे राहुन, रेल्वे गाड्यांना मार्ग दाखविला.

इन्फो :

एडीआरएम यांनी केली कामाची पाहणी

सकाळी मेगाब्लॉकच्या कामाला सुरूवात झाल्यानंतर भुसावळ विभागाचे एडीआरएम मनोजकुमार सिन्हा यांनी जळगावी येऊन, या मेगाब्लॉकच्या कामाची ठिकाणी एक तास पाहणी केली. यावेळी त्यांनी सिग्नल यंत्रणेचे तांत्रिक काम चोख पद्धतीने पार पाडण्याच्या सुचनाही कर्मचाऱ्यांना दिल्या. यावेळी जळगाव रेल्वे स्टेशनचे प्रबंधक अमरचंद अगरवाल व इतर अधिकारी उपस्थित होते.

इन्फो :

रेल्वे गेट बंद असल्याने हजारो वाहनधारकांची गैरसोय

तिसऱ्या रेल्वे मार्गावर सिग्नल यंत्रणेच्या कामासाठी रेल्वे प्रशासनातर्फे घेण्यात आलेल्या मेगाब्लॉकमुळे रेल्वे प्रशासनाने असोदा गेट व भादली गेट दोन दिवस दिवस बंद ठेवले आहे. परिणामी यामुळे शुक्र‌वारी सकाळी असोदा गेट बंद झाल्यावर वाहनधारकांची चांगलीच गैरसोय झाली. त्यामुळे या मार्गावरील हजारो वाहनधारकांना प्रजापत नगरातून ममुराबाद पुलामार्गे शनिपेठकडे गावात यावे लागले. विशेष म्हणजे पावसामुळे हा रस्ता अतिशय चिखलमय झाल्यामुळे वाहनधारकांची मोठी गैरसोय झाली. तसेच दोन वर्षांपासून या रेल्वे मार्गाकडील पर्यायी रस्त्याची अद्याप दुरूस्ती न करण्यात आल्यामुळे, नागरिकांमधुन मनपा प्रशासनाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, हे गेट बंद असल्यामुळे प्रवासी वाहनधारक व रिक्षा चालकांनी गेटवरच प्रवाशांना सोडले व पुन्हा हे प्र‌वासी गेटच्या पलीकडे उभ्या असलेल्या वाहनांमधुन गावकडे परतले.