शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

४० टक्के शहराचा पाणीपुरवठा बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2017 00:11 IST

धुळे : मनपाने पाणीपट्टी न भरल्याने पाटबंधारे विभागाने मंगळवारी सायंकाळी नकाणे तलावातून होणारा पाणीपुरवठा खंडित केल्यामुळे ४० टक्के शहरावर ऐन हिवाळयात पाण्याचे संकट ओढवले आहे़

धुळे : मनपाने पाणीपट्टी न भरल्याने पाटबंधारे विभागाने मंगळवारी सायंकाळी नकाणे तलावातून होणारा पाणीपुरवठा खंडित केल्यामुळे ४० टक्के शहरावर ऐन हिवाळयात पाण्याचे संकट ओढवले आहे़ दरम्यान, पाटबंधारे विभागाने कारवाई करताच मनपा प्रशासनाची धावपळ सुरू झाली, रात्री उशिरापर्यंत मनपात वरिष्ठ अधिकाºयांकडून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू होते़ शहराला नकाणे तलाव व सुलवाडे बॅरेजवरून मनपाला पाणीपुरवठा केला जातो़ त्यासाठी पाटबंधारे विभागाकडून पाणीपट्टी आकारली जाते़ दरम्यान, मनपाकडे डिसेंबर अखेरपर्यंत थकीत व चालू अशी एकूण ३ कोटी ७ लाख रुपयांची पाणीपट्टी भरावी, यासाठी पाटबंधारे विभागाने मनपा प्रशासनाला वारंवार नोटिसा दिल्या होत्या़  अखेर पाटबंधारे विभागाने २७ डिसेंबरला नोटीस देऊन ३ जानेवारीला पाणीपुरवठा खंडित करणार असल्याचे मनपाला सूचित केले होते़ त्यानंतरही नोटिसीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने मंगळवारी दुपारी अंतिम नोटीस देऊन सायंकाळी पाच वाजता नकाणे तलावाचे गेट बंद करून पाणीपुरवठा खंडित करण्यात आल्याचे पाटबंधारे विभागातर्फे सांगण्यात आले़ पाणीपुरवठा खंडित होताच मनपा प्रशासनाची धावपळ उडाली़ तातडीने  ४३ लाख ४ हजार ८६ रुपयांचा धनादेश देण्याची तयारी दर्शवित निवासी उपजिल्हाधिकारी तसेच पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांशी चर्चा केली़ मनपाचे लेखाधिकारी माधव सराई दोन दिवसांपासून रजेवर असून धनादेशावर त्यांची स्वाक्षरी आवश्यक असल्याने पाटबंधारे विभागाने कारवाई बुधवारपर्यंत स्थगित करावी, अशी मागणी केली होती, असे मनपा पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केले़ दरम्यान, मनपाने वर्षभरात ३६० दलघफू पाणी घेणे करारानुसार आवश्यक आहे़ त्यामुळे दररोज ०़७० दलघफू पाणी उचलणे अपेक्षित असताना मनपाकडून दररोज २ दलघफूपेक्षा अधिक पाणी उचलले जात असून त्यावरदेखील पाटबंधारे विभागाने आक्षेप नोंदविला होता़ दरम्यान, बुधवारी मनपाकडून पाणीपट्टी भरली जाण्याची शक्यता आहे़ नकाणे तलावातून शहराच्या ४० टक्के भागाला पाणीपुरवठा केला जातो़ शहराची लोकसंख्या सध्या ४ लाखांच्या जवळपास असल्यामुळे जवळपास दीड लाखापेक्षा अधिक नागरिकांना या कारवाईचा फटका बसू शकतो़ पाटबंधारे विभागाकडून पाणीपुरवठा खंडित करण्यात आला असला तरी महापालिकेकडून लवकरच पाणीपट्टी भरण्यात येणार असून पाणीपुरवठा तत्काळ सुरळीत केला जाईल़         -संगीता धायगुडेआयुक्त, मनपा, धुळे