लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शिवसेना जळगाव जिल्हा, सरदार वल्लभभाई पटेल बहुउद्देशिय विकास संस्था व युवा विकास फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक दिनानिमित्त आयोजित लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल आदर्श शिक्षक पुरस्कार व कोरोना योध्दा सन्मान सोहळा नुकताच सरदार वल्लभभाई पटेल भवनात पार पडला. यावेळी ३९ कोरोना योध्दा व आदर्श शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.
अध्यक्षस्थानी पालकमंत्री गुलाबराव पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार चंद्रकांत सोनवणे, महापौर जयश्री महाजन, शिवसेना जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, समाधान पाटील, अनिल झोपे, शरद तायडे, शोभा चौधरी, प्रशांत वारके, स्नेहल फेगडे आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक विष्णू भंगाळे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ.खेमराज पाटील यांनी केले.
या कोरोना योध्दांचा सन्मान
डॉ.राम रावलानी, डॉ. नेहा भारंबे, डॉ. संजय पाटील, डॉ.विजय घोलप, डॉ.सायली पवार, डॉ. पल्लवी नारखेडे, डॉ.पल्लवी पाटील, डॉ. सोनल कुळकर्णी, डॉ.लिपीका प्रथयानी, डॉ.कल्याणी मिसाळ, आरोग्य सेवक सुनील ढाके, जयंत पाटील, शितल पाटील, चंद्रकांत चव्हाण, सुनीता चौधरी, विलास बोंडे यांचा कोरोना योध्दा म्हणून सन्मान करण्यात आला.
हे आहेत आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त
डॉ.पी.व्ही.दलाल, डॉ.निलीमा वारके, प्राजक्ता पाटील, डॉ. निशांत घुगे, प्रा.दीपाली किरंगे, डॉ.राकेश चौधरी, प्रतिभा राणे, वंदना चौधरी, स्वाती ब-हाटे, ज्योती महाजन, प्रकाश गवळी, बी.आर.महाजन, साजिद खान, विष्णू गुजर, प्रगती येवले, रवींद्र पाटील, नरेंद्र वारके, संजय क्षिरसागर, संजय झोपे, फरिदा तडवी, संजीव नेमाडे, एकनाथ पाटील, वैशाली महाजन आदींचा लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
यांनी घेतले परिश्रम
यशस्वीतेसाठी ललित महाजन, महेंद्र पाटील, बिपीन झोपे, सुरेश अत्तरदे, योगेश महाजन, राजेश वारके, नीलेश पाटील, शैलेश काळे, विक्की काळे, प्रशांत सुरळकर, राकेश पाटील, अतुल इंगळे, एकनाथ देशपांडे, स्वप्निल रडे, उमेश पाटील, रोहिदास ठाकूर, निखिल चौधरी, सुनील चंदनकर, सचिन पाटील, गोलू लोखंडे, अजित चौधरी, राहुल चौध्ररी, ललित काळे, नरेंद्र बोरसे, सचिन महाजन, दीपक भारंबे, विक्की भंगाळे, गौरव भोळे, सागर सरोदे, हर्षल चौधरी, मोहित धांडे, सिध्दार्थ कोलते आदींनी परिश्रम घेतले.