लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेतर्फे शिक्षक दिना निमित्त 'शिक्षक दिन कृतज्ञता सोहळा' या कार्यक्रमाअंतर्गत कला, क्रिडा, नृत्य, साहीत्य, सामाजिक व पर्यावरण आदी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणा-या ३५ शिक्षकांना सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. हा कार्यक्रम शहरातील काव्यरत्नावली चौकातील भाऊंच्या उद्यानात पार पडला.
यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून लेखक मनोज गोविंदवार, मनोहर पाटील, भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अॅड. राहूल वाकलकर, अनिल बाविस्कर, अविनाश जावळे, महासचिव सागर महाजन, सचिव आकाश पाटील आदींची उपस्थिती होती. जळगाव शहरातील १५, तालुक्यातील १० शिक्षक व धरणगाव तालूक्यातील १० शिक्षकांचा मान्यवरांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर यांनी कार्यक्रमाप्रसंगी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक युवा परिषदेचे जिल्हाध्यक्ष अनिल बाविस्कर यांनी केले. सूत्रसंचालन जिल्हा समन्वयक राहुल पाटील यांनी केले तर जिल्हा समन्वयक धनश्री ठाकरे यांनी आभार मानले.
यशस्वीतेसाठी युवा परिषदेचे जिल्हा समन्वयक इरफान पिंजारी, भावेश रोहीमारे, किरण तायडे, विद्या कोळी, नयनकुमार पाटील यांच्यासह श्रावण धनगर, नीलेश पवार, चंदन अत्तरदे, कल्पेश बोरसे, अनिकेत सोनवणे, सौरभ जैन, धनश्री माळी, तालुका पदाधिकारी तुषार विसपुते, उमेश सूर्यवंशी यांनी परिश्रम घेतले.