शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

अजिंठा घाटात अपघातामुळे जळगाव जिल्ह्यातील 33 एसटी बसेस् अडकल्या

By admin | Updated: May 6, 2017 17:00 IST

या बसना मागे जाऊन मार्ग बदलणे शक्य नसल्याने त्या सहा तास तशाच अडकून होत्या.

ऑनलाइन लोकमत

जळगाव : अजिंठा घाटात दोन ट्रकचा अपघात झाल्याने वाहतुकीचा खोळंबा होऊन जळगावकडे येणा:या व जळगावसह इतर आगारांमधून औरंगाबाद, पुणेकडे जाणा:या 33 एसटी बस अडकल्या. या बसना मागे जाऊन मार्ग बदलणे शक्य नसल्याने त्या सहा तास तशाच अडकून होत्या. यामुळे जिल्हा प्रशासनाचे आदेश घेऊन जिल्ह्यातील एसटीच्या आगारांमधून सुटणा:या 25 एसटी बस सोयगावमार्गे घाटनांद्रा घाटातून वळविण्यात आल्या. त्यात जवळपास 960 प्रवाशांना जादा भाडे द्यावे लागले. एक कि.मी.मागे एक रुपया अधिक अशा स्वरुपात भाडे आकारण्यात आले. फर्दापूर येथे स्वतंत्र कक्षाद्वारे त्यासंबंधीच्या सूचना वाहकांना देण्यात आल्या. पहाटे अजिंठा घाटात अपघात घडल्यानंतर त्याची माहिती लागलीच एसटीच्या विभागीय कार्यालयास न मिळाल्याने काही बस फर्दापूरमार्गे पुढे घाटाकडे गेल्या. त्या जशा पुढे गेल्या तशा मागे येणे शक्य नव्हते. त्यामुळे यावल आगारातील सहा, जळगाव आगारातील सहा, जामनेर आगारातील सहा, मुक्ताईनगर आगारातील एक व भुसावळ आगारातील सहा एसटी बस अडकल्या. या बसमागेही मोठी वाहतूक कोंडी झाली. पर्यवेक्षकांना फर्दापूरकडे तातडीने पाठविलेअजिंठा घाटात वाहतुकीची कोंडी झाल्याने सकाळी 7 वाजताच एसटीच्या वरिष्ठ कार्यालयाने एका विशेष वाहनाद्वारे पर्यवेक्षक व अधिका:यांना पाठविले. ज्या बस रस्त्यात जाताना दिसल्या त्यांना घाटनांद्रा घाटातून जाण्याच्या सूचना दिल्या. जवळपास 25 बस सोयगावमार्गे घाटनांद्रा घाटातून पाठविण्यात आल्या. यातील 960 प्रवाशांना जादा भाडे द्यावे लागल्याची माहिती मिळाली. सकाळी सहा व सातदरम्यान निघालेल्या 20 बस अडकल्यासकाळी सहा व सात यादरम्यान औरंगाबाद व पुणेकडे यावल, जळगाव, जामनेर, भुसावळ या आगारांमधून निघालेल्या 20 एसटी बस अजिंठा घाटातील कोंडीत अडकल्या. त्यांच्यामागे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने त्यातील प्रवाशांसाठी कुठलीही पर्यायी व्यवस्था लागलीच करणे शक्य झाले नाही. अशा जवळपास 700 प्रवाशांना मन:स्ताप सहन करावा लागला. येणा:या 13 बस अडकल्याजळगावकडे औरंगाबाद, पुणे, बुलडाणा, सिल्लोड, अकोला आदी ठाकाणाहून येणा:या जवळपास 13 बस घाटात अडकल्या. त्या बसचा मार्ग लागलीच बदलणे शक्य झाले नाही. या बसमध्येही जवळपास 500 प्रवासी होते.  सकाळी 10 वाजता वाहतूक सुरळीत झाल्याची माहितीएसटीच्या विभागीय कार्यालयास सकाळी 10 वाजता वाहतूक सुरळीत झाल्याची माहिती देण्यात आली. पण 11 वाजेनंतर वाहतुकीची कोंडी दूर झाली.