शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यातील 2500 औषध दुकाने उद्या बंद राहणार

By admin | Updated: May 29, 2017 10:41 IST

केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट संघटनेच्यावतीने 30 मे रोजी औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील 2500 औषध विक्रेते सहभागी होणार आहे.

ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.29 - ऑल इंडिया ऑर्गनायङोशन केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट संघटनेच्यावतीने 30 मे रोजी औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे.  यामध्ये जळगाव  जिल्ह्यातील 2500 औषध विक्रेते सहभागी होणार आहे.  दरम्यान, बंद  काळात रुग्णांचे हाल होऊ नये म्हणून अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. 
ऑनलाईन औषधी विक्रीचे घातक परिणाम असल्याने त्यावर तब्बल 70 हजार आक्षेप नोंदवूनही केंद्र सरकारच्यावतीने त्यावर कोणत्याही उपाययोजना होत नसल्याने हा बंद पुकारण्यात आला आहे. 30 मेच्या बंदच्या पाश्र्वभूमीवर सोमवार, 29 रोजी जिल्हा औषध विक्रेता संघटनेची बैठक होणार असून त्यामध्ये बंदविषयी चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष सुनील भंगाळे यांनी दिली.
पुरेशा प्रमाणात औषध साठा उपलब्ध करण्याच्या सूचना
औषध विक्रेत्यांनी औषध दुकाने बंद ठेवल्यास औषध पुरवठा सुरळीत राहण्यासाठी सर्व सहकारी, निमसरकारी रुग्णालयात तसेच खाजगी रुग्णालये व वैद्यकीय व्यावसायिकांनी पुरेसा औषधसाठा ठेवण्याच्या सूचनादेखील प्रशासनातर्फे देण्यात आल्या आहेत. 
नियंत्रण कक्षाशी संपर्क साधा
प्रशासनातर्फे बंद काळात आंबेडकर मार्केटमधील पहिल्या मजल्यावर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कार्यालयात स्वतंत्र नियत्रंण कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे.औषध निरीक्षक  म.बा.कवटीकवार,   म. नं. अय्या ,  जे.एम. चिरमेल  हे नियंत्रण कक्षात उपस्थितीत राहणार असून गरजूंनी त्यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्तांनी केले आहे.