शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

पारोळा तालुक्यातील 21 गावांना भीषण पाणी टंचाई

By admin | Updated: June 22, 2017 17:06 IST

पावसाळ्यातही सात गावांना टॅँकरनेपाणी पुरवठा

 ऑनलाईन लोकमत

पारोळा,दि.22 : पावसाळा सुरू झालेला आहे. मात्र अद्यापही समाधानकारक पाऊस नसल्याने, तालुक्यात आजही 21 गावांना पिण्याच्या पाण्याची तीव्र पाणी टंचाई आहे. यात सात गावांना टँकरने पाणी पुरवठा, तर  पाच गावांसाठी विहीर अधिग्रहण करण्यात आले आहे. या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी 20 जूनर्पयत आठ लाखाचा खर्च  झाला आहे.
तालुक्यात बोरी धरण वगळता सर्व धरणात पाण्याचा ठणठणाट  आहे. भोकरबारी, इंदासी, खोलसर, सावरखेडे, शिरसमणी, कंकराज, लोणी यासर्व धरणात मृतसाठा असल्याने या धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या गावांना पाण्याची तीव्र टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. 
तालुक्यात वाघ्रा, वाघरी, मोहाडी, दहीगाव, खेडीढोक, हणुमंतखेडा, मोरफळ या सात गावांना शासकीय टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे. या टँकर डिङोल चालकाचा पगारावर साडेचार लाखाचा निधी खर्च झालेला आहे.
तर जिराळी गावाला मंजाबाई करंजे, वडगाव प्र.अ.गावाला भिला ढोमण पाटील, कोळपिंप्री गावाला  रेश्माबाई नानाभाऊ पाटील, आंबापिंप्री येथे भिकन सखाराम पाटील, शेळावे खु. गावाला प्रकाश यादव पाटील या शेतक:यांच्या खाजगी विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. या शेतक:यांना 400  रुपये रोज प्रमाणे विहीर अधिग्रहणाचा मोबदला देण्यात येत आहे. 20 जून अखेर या सर्व अधिग्रहीत विहिरीसाठी तीन लाख 25 हजाराचा खर्च देण्यात आला आहे. एकूण सात लाख 75 हजारांचा खर्च पाणी टंचाई निवारणासाठी करण्यात आला आहे.
तर सबगव्हाण आणि शिरसोदे गावांना पाणी टंचाई निवारणासाठी टँकरची मागणी केली आहे. मागणी प्रस्ताव ग्रामीण पाणी पुरवठा अमळनेर कार्यालयाकडे मंजूरीसाठी पाठविण्यात आला आहे. तर पुनगाव, पोपटनगर, भिलाली, भोलाणे, बहादरपूर, सांगवी, नेरपाट या गावांचे टँकर मंजुरीचे प्रस्ताव तहसीलदार पारोळा यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहे. जून महिन्यात भीषण पाणी टंचाई समस्या निर्माण झाली. शिरसोदे, बहादरपूर या गावांना नागरिक 50 रुपये टाकीप्रमाणे पाणी विकत घेत आहेत. 20 ते 25 दिवसाआड पाणी या गावांना मिळत आहे.