शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
5
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
6
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
7
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
8
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
9
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
10
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
11
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
13
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
14
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
15
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
16
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
17
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
18
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
19
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
20
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

रावेर, चोपडा व पाचोरा तालुक्यातील नद्यांवर २१ बंधारे

By admin | Updated: March 4, 2017 00:42 IST

नदी पुनरुज्जीवन प्रस्तावास तत्त्वत: मान्यता : सात कोटी १३ लाख रुपयांचा निधी मंजूर

जळगाव : जिल्ह्यातील पाच नद्यांच्या पुनरुज्जीवन प्रस्तावास शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाने तत्त्वत: मान्यता दिली असून त्यासाठी सात कोटी १३ लाख रुपयांचा निधीही मंजूर केला आहे. यामध्ये रावेर, चोपडा व पाचोरा या तीन तालुक्यांमध्ये २१ बंधारे उभारले जाणार असल्याची  माहिती जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी दिली.यासंदर्भात जिल्हाधिकाºयांना ग्रामविकास विभाग व जलसंधारण विभागाकडून पत्र प्राप्त झाले असून जिल्ह्यातील नदी पुनरुज्जीवन कार्यक्रमांतर्गत पाच नद्यांवर २१ सिमेंट नाला बांध बांधून त्याद्वारे पाणी अडवून नदी पुनरुज्जीवन करण्यास मान्यता देण्यात आली आहे.  बोकड नदीवरील बंधाºयांसाठी १ कोटी ८४ लाख ३३ हजार रुपये, सोनद नदीवरील बंधाºयांसाठी १ कोटी तीन लक्ष ५८ हजार रुपये, उतावळी नदीवरील बंधाºयांसाठी १ कोटी ८६ लाख ५ हजार रुपये, हिवरा नदीवरील बंधाºयासाठी ८५ लाख २ हजार रुपये तर चंपावती नदीवरील बंधाºयांसाठी १ कोटी ५३ लाख ४२ हजार रुपये असे एकूण ७ कोटी १३ लाख ३ हजार रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला आहे. या कामांबाबतचा सविस्तर प्रस्ताव सक्षम अधिकाºयांकडून दिलेल्या तांत्रिक मंजुरीसह व जिल्हाधिकाºयांनी दिलेल्या प्रशासकीय मान्यतेसह लघुसिंचन ( जलसंधारण) विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांनी सविस्तर निधी मागणी प्रस्ताव शासनाकडे पाठवावा, असे निर्देशही देण्यात आले आहेत. तसेच या योजनेत संबंधित क्षेत्रात करावयाची नाला जलसंधारण उपचार व क्षेत्र जलसंधारण उपचाराची कामेही अंतर्भूत करावीत व प्रस्ताव तातडीने शासनाकडे पाठवावा, असे पत्र अवर सचिव यांच्या कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त  झाल्याचे अग्रवाल म्हणाल्या़यापाच नद्यांवर होणार बंधारे४रावेर तालुक्यातील बोकड नदीवर ८ बंधारे४पाचोरा तालुक्यातील सोनद नदीवर ३४उतावळी नदीवर ७ ४हिवरा नदीवर एक ४चोपडा तालुक्यातील चंपावती नदीवर २