शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
3
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
4
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
5
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
6
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
7
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
8
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
9
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
10
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
11
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
12
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
13
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
14
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
15
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार
16
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
17
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
18
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
19
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
20
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?

जिल्ह्यातील ५ नद्यांवर २१ बंधारे

By admin | Updated: March 4, 2017 00:55 IST

नदी पुनरुज्जीवन प्रस्तावास मान्यता : ७ कोटी १३ लाखांचा निधीही मंजूर

जळगाव : जिल्ह्यातील पाच नद्यांच्या पुनरुज्जीवन प्रस्तावास शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाने तत्त्वत: मान्यता दिली असून त्यासाठी ७ कोटी १३ लाख रुपयांचा निधीही मंजूर केला आहे. यामध्ये रावेर, चोपडा व पाचोरा या तीन तालुक्यांमध्ये २१ बंधारे उभारले जाणार असल्याची  माहिती जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी दिली.यासंदर्भात जिल्हाधिकाºयांना ग्रामविकास विभाग व जलसंधारण विभागाकडून पत्र प्राप्त झाले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील नदी पुनरुज्जीवन कार्यक्रमांतर्गत पाच नद्यांवर २१ सिमेंट नाला बांध बांधून त्याद्वारे पाणी अडवून नदी पुनरुज्जीवन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. मागणी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशया कामांबाबतचा सविस्तर प्रस्ताव सक्षम अधिकाºयांकडून दिलेल्या तांत्रिक मंजुरीसह व जिल्हाधिकाºयांनी दिलेल्या प्रशासकीय मान्यतेसह लघुसिंचन (जलसंधारण) विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांनी सविस्तर निधीची मागणी करणारा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा, असे निर्देशही देण्यात आले         आहेत. तसेच या योजनेत संबंधित क्षेत्रात करावयाची नाला जलसंधारण उपचार व क्षेत्र जलसंधारण उपचाराची कामेही अंतर्भूत करावीत व प्रस्ताव तातडीने शासनाकडे पाठवावा, असे पत्र अवर सचिव यांच्या कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झाल्याची माहितीही जिल्हाधिकारी अग्रवाल यांनी दिली.या पाच नद्यांवर  होणार बंधारे रावेर तालुक्यातील बोकड नदीवर ८ बंधारे पाचोरा तालुक्यातील सोनद नदीवर ३ उतावळी नदीवर ७ हिवरा नदीवर एक  चोपडा तालुक्यातील चंपावती नदीवर २ अशा एकूण २१ बंधाºयांच्या कामास मान्यता देण्यात आली आहे. असा निधी झाला मंजूर बोकड नदीवरील बंधाºयांसाठी १ कोटी ८४ लाख ३३ हजार रुपये, सोनद नदीवरील बंधाºयांसाठी १ कोटी तीन लक्ष ५८ हजार रुपये, उतावळी नदीवरील बंधाºयांसाठी १ कोटी ८६ लाख ५ हजार रुपये, हिवरा नदीवरील बंधाºयासाठी ८५ लाख २ हजार रुपये तर चंपावती नदीवरील बंधाºयांसाठी १ कोटी ५३ लाख ४२ हजार रुपये असे एकूण ७ कोटी १३ लाख ३ हजार रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला आहे.