शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

१८ तात्पुरत्या नळ योजनांना मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 11:28 IST

३ वर्षात ६ गावे झाली टँकरमुक्त

ठळक मुद्देपाणीटंचाई

जळगाव : जिल्हा दुष्काळी जाहीर झाला असून टंचाईची परिस्थिती यंदा नेहमीपेक्षा अधिक गंभीर असल्याने मोठ्या प्रमाणावर पाणीटंचाई जाणवणार आहे. त्यामुळे आतापर्यंत २१३ गावांना टँकर सुरू करण्यासह २२८ विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यात १८ गावांसाठी १ कोटी ५४ लाख रूपये खर्चाच्या १८ तात्पुरत्या नळपाणी योजनांना मंजुरी देण्यात आली आहे.या गावांना नळपाणी योजना मंजूरयंदा तात्पुरती नळपाणी योजना मंजूर करण्यात आलेल्या गावांमध्ये जळगाव तालुक्यातील जवखेडे, रामदेववाडी, जामनेर तालुक्यातील पाळधी, भडगाव तालुक्यातील कजगाव, पथराड, बात्सर, ग्रा.पं. अंचळगाव अंतर्गत धोत्रे, चाळीसगाव तालुक्यातील देशमुखवाडी, अलवाडी, पाटखडकी एमएसईबी सबस्टेशन, खडकी बु., डामरूण,भामरे, एरंडोल तालुक्यातील वनकोठे, आनंदनगर, धरणगाव तालुक्यातील सोनवद बु., भुसावळ तालुक्यातील कन्हाळे बु., पाचोरा तालुक्यातील कºहाड बु.(लाखतांडा) या गावांचा समावेश आहे. या १८ गावांमधील ४६ हजार २०३ लोकसंख्येला यामुळे दिलासा मिळणार आहे.६ गावे झाली टँकरमुक्ततात्पुरत्या नळपाणीपुरवठा योजनांमुळे गत तीन वर्षात ६ गावे टँकरमुक्त झाली आहेत. २०१५-१६ या वर्षात जळगाव तालुक्यातील शिरसोली प्र.न., जामनेर तालुक्यातील कालखेडा, चाळीसगाव तालुक्यातील कळमडू, अमळनेर तालुक्यातील टाकरखेडे, पारोळा तालुक्यातील कन्हेरे, तर २०१६-१७ या वर्षात मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळे अशी ७ गावे टँकरमुक्त झाली आहेत.टँकरच्या खर्चात बचतटंचाई कालावधीतील तात्पुरत्या नळपाणी पुरवठा योजनांमुळे टँकरचा खर्च वाचत असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या आकडेवारीवरून आढळून आले आहे. पाणी टंचाई कालावधी २०१५-१६ मध्ये पाचोरा व अमळनेर या शहरांसाठी तातडीच्या पाणीपुरवठा योजना शासनाने मंजूर केल्या होत्या. त्यामुळे टंचाई कालावधीत या शहरांना पाणीपुरवठा करण्यासाठी आवश्यक किमान ५० टँकरच्या खर्चात बचत झाली होती.