शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

जीएमसीत म्युकरचे १५ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:12 IST

आनंद सुरवाडे लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोविडनंतर म्युकरमायकोसिसने डोकेवर काढले होते. या आजाराचे रुग्ण कमी झाले असले तरी ...

आनंद सुरवाडे

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोविडनंतर म्युकरमायकोसिसने डोकेवर काढले होते. या आजाराचे रुग्ण कमी झाले असले तरी मृत्यूची संख्या काहीशी वाढली आहे. शासकीय पोर्टलवरील नोंदीनुसार जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे १६ मृत्यू झाले असून, यातील १५ मृत्यू हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील आहेत. मात्र, या ठिकाणी एवढे मृत्यू झाले नसल्याचा दावा रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात येत आहे. त्यामुळे आकडेवारीतील ही तफावत आहे की मृत्यूबाबत माहिती लपविली जात आहे, असा एक प्रश्न समोर आला आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांकडून मिळालेल्या माहितीनुसार या रुग्णालयात उपचार सुरू झाल्यापासून रुग्णांची संख्या ही ३१वर गेली नाही. शिवाय सद्य:स्थिती केवळ २० रुग्णांवर या ठिकाणी उपचार सुरू असल्याची माहिती जीएमसीतून मिळाली आहे. मात्र, प्रत्यक्षात पोर्टलवरील आकडेवारी व जीएमसीतून सांगितली जात असलेली माहिती यात मोठी तफावत असल्याचे समोर येत आहे. जीएमसीतील सीटू कक्षात नॉनकोविड तर ७ नंबरच्या कक्षात कोविड मात्र म्युकरची लागण झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यात आले होते.

१२ रुग्ण गेले उपचार सोडून

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातून १२ रुग्ण हे अर्धवट उपचार घेऊन परतल्याची माहिती शासकीय पोर्टलवर नमूद करण्यात आली आहे. या रुग्णांवर कमीत कमी १४ दिवस उपचार करावे लागतात, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. यातील तीन रुग्णांना मेंदूवर शस्त्रक्रिया करायची असल्याने ते मुंबई येथे हलविण्यात आले होते.

कोट

जीएमसीकडून येणाऱ्या रुग्णांच्या अहवालानुसारच ते पोर्टलवर अपलोड केले जात असतात. जर कमी रुग्ण असतील तर त्यांनी तसे कळवावे, तसे बदल करण्यात येतील. कालच्या आकडेवारीनुसार जीएमसीतील ३५ रुग्णावंर उपचार सुरू आहेत, तर आतापर्यंत १५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. - डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक

आमच्याकडे दोनच मृत्यू - अधिष्ठाता

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शुक्रवारपर्यंत २० रुग्ण उपचार घेत होते. त्यातील एकाला डिस्चार्ज मिळाला असून, आतापर्यंत दोन मृत्यू झाले आहेत. म्युकरचे एकूण ८९ रुग्ण होते. - डॉ. जयप्रकाश रामानंद, अधिष्ठाता जीएमसी

शासकीय नोंद काय सांगते

म्युकरचे एकूण रुग्ण १२५

उपचार सुरू असलेले रुग्ण : ७२

मृत्यू १६

उपचार सोडून गेलेले रुग्ण १८

पोर्टलनुसार जीएमसीचे रुग्ण ७४

उपचार सुरू असलेले रुग्ण ३५

बरे झालेले रुग्ण ९

मृत्यू १५

सोडून गेलेले रुग्ण १२