शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

अर्ध्या तासातच १४ गुरांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2017 23:34 IST

स्टार्च फॅक्टरीचे रासायनिक सांडपाणी पिऊन १४ जनावरांचा झालेला मृत्यू सुधाकर पाटील हे गुरूवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास शेतात पाहणी करण्यासाठी गेले असताना उघड झाला.

 धुळे : देवपूरातील बिलाडी रोडवरील ट्रेडको स्टार्च फॅक्टरीचे रासायनिक सांडपाणी  पिऊन १४ जनावरांचा झालेला मृत्यू सुधाकर पाटील हे गुरूवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास शेतात पाहणी करण्यासाठी गेले असताना उघड झाला.

शेतातील गुरे आपल्या मालकीची असून रासायनिक पाणी पिल्यामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचे चंद्रकांत केले यांनी सांगितले. सुधाकर पाटील यांना फॅक्टरीचे रासायनिक सांडपाणी शेतातील खड्ड्यात साचलेले दिसले. पाणी पिऊन भोवळ येऊन जमिनीवर पडत असलेली जनावरेही त्यांना दिसून आली. त्यांनी ही बाब चंद्रकांत केले व  पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सैंदाणे यांना भ्रमणध्वनीवरून सांगितली. आरंभी डॉ. सैंदाणे यांनी जनावरांवर औषधोपचार केले. परंतु, जनावरे कोणताही प्रतिसाद न देता तडफडत होती. या वेळी पशुसंवर्धन विभागाचे डॉ. निकमही आले. त्यांनीही गुरांवर उपचार सुरू केले. मात्र, उपचार सुरू असताना अर्ध्या तासातच १४ गुरांचा मृत्यू झाला. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप देवरे यांनाही बोलविले. त्यांनीही मृत जनावरांची पाहणी केली. त्यांनीच या जनावरांचे शवविच्छेदन केले. त्यात विषबाधेमुळे जनावरांचा मृत्यू झाल्याचे डॉ. देवरे यांनी सांगितले.