शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

13 टक्के भूसंपादन बाकी : फेब्रुवारीत होणार दुरुस्ती

By admin | Updated: January 22, 2017 00:27 IST

महामार्गाच्या दुरूस्तीसाठी 10 कोटींचा प्रस्ताव

जळगाव : राष्ट्रीय महामार्ग व साईडपट्टय़ांच्या झालेल्या दुरवस्थेमुळे दररोज अपघात होत असल्याची गंभीर दखल शुक्रवारी जिल्हा दौ:यावर आलेल्या पालकमंत्र्यांनी घेतली. महामार्ग दुरुस्तीचे तत्काळ निर्देश त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दिल्यानंतर प्राधिकरणाने महामार्ग दुरुस्तीसाठी 10 कोटींचा प्रस्ताव तातडीने तयार केला असून तो मंजुरीसाठी दिल्ली येथे प्राधिकरणाकडे पाठविण्यात आला आहे. तो मंजूर झाल्यानंतर साधारणत: फेब्रुवारी महिन्यात दुरुस्तीचे काम सुरु होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.दरम्यान, महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी जिल्ह्यात 87 टक्के भूसंपादन झाले असून  13 टक्के भूसंपादन बाकी आहे. जिल्ह्यातील 6 तालुक्यातून महामार्ग जाणार आहे, त्यापैकी एकाही तालुक्यात 100 टक्के भूसंपादन झालेले नाही. 40 पैकी 35 लाख क्षेत्र ताब्यात चौपदरीकरणाच्या या कामासाठी 40 लाख 81 हजार 779 चौ.मी. क्षेत्र संपादीत करावयाचे होते. त्यापैकी आतार्पयत 35 लाख 71 हजार 578 चौ.मी.क्षेत्र ताब्यात घेण्यात (87.50 टक्के)आले आहे.  भूसंपादनासाठी 325 कोटी 99 लाख 37 हजार 380 एवढा निधी प्राप्त झाला आहे. पैकी 299 कोटी 91 लाख 29 हजार 250 एवढा निधी शेतक:यांना वाटप करण्यात आला आहे.पालकमंत्र्यांच्या                   निर्देशानंतर ‘नही’ गतिमान पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी  चौपदरीकरणाबाबत मुंबईत घेतलेल्या  बैठकीत भूसंपादनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार या कामाला गती देण्यात आली आहे. तसेच शुक्रवारी शहरवासी व अनेक सामाजिक, राजकीय संघटनांनी महामार्गाची दैना झाल्याने त्यांच्याकडे तीव्र नाराजी व्यक्त केली. महामार्गावर होत असलेल्या वाढत्या अपघाताबाबत ‘लोकमत’ने त्यांचे लक्ष वेधल्याने त्यांनी महामार्गाच्या दुरुस्तीचे तातडीने निर्देश दिले होते. त्यानंतर ‘नही’गतिमान झाली. ‘नही’च्या अधिका:यांनी शनिवारी तातडीने 10 कोटींचे अंदाजपत्रक तयार करून ते राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, नवी दिल्लीकडे मंजूरीसाठी पाठविले आहे.  येत्या फेब्रुवारी महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरवात होईल.