घरासमोर उभी असलेली दुचाकी लंपास
जालना : घरासमोर उभी केलेली दुचाकी चोरट्यांनी लंपास केल्याची घटना रेल्वेस्थानक परिसरातील जमुनानगर येथे घडली. याप्रकरणी नितीन दिनकर गोदाम यांच्या फिर्यादीवरून कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
.....अखेर कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल
जालना : भरधाव वेगाने जाणाऱ्या कारचे नियंत्रण सुटून रस्त्यालगत असलेल्या विहिरीत कार पडून दोघांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोना सुभाष डोईफोडे यांच्या फिर्यादीवरून कारचालक अजहर अफसर अली कुरेशी (वय २४ रा. शाहुनगर, पांगरीरोड) यांच्याविरुद्ध तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सपोनि. संभाजी वडते हे करीत आहेत.
कुरेशीवाडी येथून दुचाकी चोरीस
जालना : घरासमोर उभी केलेली दुचाकी चोरट्यांनी लंपास केल्याची घटना भोकरदन तालुक्यातील कुरेशीवाडी येथे १६ फेब्रुवारीच्या मध्यरात्री घडली. याप्रकरणी मुनिरखान यासिनखान कुरेशी यांच्या फिर्यादीवरून हसनाबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास नापोकॉ. मान्टे हे करीत आहेत.
पती-पत्नीस लुटले ; गुन्हा दाखल
जालना : अज्ञात चोरट्यांनी पती-पत्नीस मारहाण करून गळ्यातील मंगळसूत्र व १५ कोंबड्या असा २५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना जालना तालुक्यातील नंदापूर येथे १७ फेब्रुवारी रोजी घडली. याप्रकरणी केशरबाई बळीराम वानखेडे यांच्या फिर्यादीवरून चोरट्यांविरुद्ध तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोउपनि काकडे हे करीत आहेत.
४०० लिटर डिझेल चोरले
जालना : रस्त्यावर उभा असलेल्या ट्रकमधून ३५ हजार ३८० रुपयांचे ४०० लिटर डिझेल चोरून नेल्याची घटना सोलापूर डोणगाव शिवारात २९ जानेवारी रोजी घडली. याप्रकरणी शुक्रवारी रहिम चांद शेख यांच्या फिर्यादीवरून चौघांविरुद्ध गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास नपोकॉ. वाघमारे हे करीत आहेत.