शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

बानेगाव पाटीजवळ कार-ट्रकच्या धडकेत दोन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 00:28 IST

कार व ट्रकच्या भीषण धडकेत कारमधील दोघे जागीच ठार झाले तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला.

लोकमत न्यूज नेटवर्ककेदारखेडा : कार व ट्रकच्या भीषण धडकेत कारमधील दोघे जागीच ठार झाले तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला. केदारखेडा-राजूर रस्त्यावरील बानेगाव पाटीवर मंगळवारी सकाळी ही घटन घडली.जामनेर तालुक्यातील शेंदूर्णी येथील तीन जण नांदेड जिल्हातील भोकर येथे कारने (क्र.एमएच २४, व्ही. ०४०७) जात असताना केदारखेड्याजवळ जालनाकडून येणा-या ट्रकने (क्र. ए. पी. १६ वाय ९९३९) राजूरकडे वळणा-या कारला समोरून जोराची धडक दिली. या अपघातात कारमधील शैंलेंद्र देविदास गुजर (४0 रा़ शेंदूर्णी ता़ जामनेर, जि. जळगाव), समाधान दरबर पारधी (३५ रा़ एकलुती ता़ जामनेर,जि.जळगाव) हे दोघे जागीच ठार झाले आहे. तर विलास ताराचंद पोष्टे (रा़ कळमसरा ) हे गंभीर जखमी झाले आहेत़अपघातात कारच्या समोरील भागाचा अक्षरश: चुराडा झाला, तर ट्रकची समोरची चाके निखळून पडली. ग्रामस्थांनी कारचे दरवाजे तोडून तिघांना बाहेर काढले. यासाठी राऊल दरक, भागवत वानखेडे, शंकर सहाणे, अंकुश सहाणे आदींनी मदत कार्य केले़ या प्रकरणी ट्रक चालक श्रीरामदास अर्जुनराव मारका (रा. पामर, जि. मच्छलीपट्टम, आंध्र प्रदेश ) याच्याविरुद्ध हसनाबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले आहे. ग्रामस्थ राऊल दरक यांनी हसनाबाद पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांना दूरध्वनीवरून अपघाताची माहिती दिली. लगेच हसनाबाद ठाण्याचे कर्मचारी प्रशांत लोखंडे व संतोष वाढेकर घटनास्थळी पोहोचले.