शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षेची आवेदनपत्रे मिळेनात

By admin | Updated: September 7, 2014 00:22 IST

जाफराबाद : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परीक्षा विभाग आणि महाराष्ट्र राज्य कॉर्पोरेशन लिमिटेड (एमकेसीएल) यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याने मोठा फटका महाविद्यालय प्रशासन

जाफराबाद : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परीक्षा विभाग आणि महाराष्ट्र राज्य कॉर्पोरेशन लिमिटेड (एमकेसीएल) यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याने मोठा फटका महाविद्यालय प्रशासन यांच्यासह विद्यार्थ्यांना बसत आहे. विद्यापीठ परीक्षा विभागाने परीक्षा आवेदनपत्र दाखल करण्याच्या तारखा निश्चित केल्या असतांना मुदत संपूनही विद्यार्थी परीक्षा आवेदन पत्र महाविद्यालयास मिळाले नाही, यामुळे विद्यार्थी तसेच महाविद्यालय प्रशासन संभ्रम अवस्थेत असल्याची माहिती समोर आलीय.महाविद्यालय स्तरावर बी.ए., बी.कॉम. बी.एस्सी. पदवी परीक्षा आवेदन पत्र स्वीकारण्याच्या सूचना विद्यार्थ्यांना देण्यात आल्या आहेत. परंतु अद्याप एमकेसीएलकडून महाविद्यालयांना परीक्षा आवेदन पत्रे मिळालेले नाही. परीक्षा विभाग यांच्याकडून परीक्षा आवेदन पत्र सादर करण्याची अंतिम मुदत २० आॅगस्ट देण्यात आली होती. यामध्ये पुन्हा बदल करून ही मुदत ३० आॅगस्ट पर्यंत वाढविण्यात आली. मात्र अद्याप आवेदन पत्र महाविद्यालय स्तरावर प्राप्त झालेले नाहीत, अशी माहिती महाविद्यालयाकडून देण्यात आली आहे.परीक्षेच्या तारखा संपून देखिल आवेदनपत्रे मिळत नाही. अशा परिस्थिती मध्ये महाविद्यालयाने विद्यार्थ्यांकडून यांच्याकडून परीक्षा आवेदनपत्र स्वीकारायचे कधी व विद्यापीठ परीक्षा विभागाकडे सादर करायचे कधी हा प्रश्न महाविद्यालय प्रशासन यांनी देखील उपस्थित केला जात आहे.परीक्षा शुल्कापासून परीक्षा आवेदनपत्र आॅनलाईन प्रक्रियेला जोडणे यामध्ये सुध्दा वेळ जात आहे. मात्र एमकेसीएल व विद्यापीठ परीक्षा विभाग यांच्या समन्वयातून सुरु असलेल्या प्रक्रियामुळे प्रवेश प्रक्रिया असो की परीक्षा कुठलीच कामे वेळेच्या आत पूर्ण होत नाहीत. त्यामुळे त्याचा त्रास देखील विद्यार्थ्यांना होत आहे.परीक्षेच्या तारखा व आवेदनपत्रे प्रक्रिया याविषयी महाविद्यालये एमकेसीएल विद्यापीठ परिक्षा विभाग यांच्याकडे महाविद्यालय स्तरावरुन विचारणा करण्यात येते; परंतु समाधानकारक उत्तर मिळत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. विद्यापीठ परीक्षा विभाग यांच्याकडे परीक्षेच्या तारखा निश्चित करण्याचे अधिकार असले तरी एमकेसीएल यांच्यावर नियंत्रण कोणाचे याचे उत्तर मात्र मिळत नाही. ग्रामीण भागातील महाविद्यालयांना या अडचणी सोबत इंटरनेट सुविधा, वीज भारनियमन असे असंख्य प्रश्न आहेत. याचा विचार व्हावा, अशी देखील मागणी महाविद्यालयाकडून होत आहे. त्याशिवाय विद्यार्थ्यांना कोणतीही सुविधा देता येणार नाही, असा सूर आहे. (वार्ताहर)विद्यापीठ परीक्षा विभागाने परीक्षा आवेदनपत्र दाखल करण्याच्या तारखा निश्चित केल्या असतांना मुदत संपूनही परीक्षा आवेदन पत्र महाविद्यालयास मिळाले नाही, यामुळे विद्यार्थी तसेच महाविद्यालय प्रशासन संभ्रम अवस्थेत असल्याची माहिती समोर आलीय.