शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात पारंपरिक उद्योग आजही तग धरून

By admin | Updated: October 17, 2014 00:26 IST

विष्णू वाकडे, रामनगर दिवाळीसण अवघ्या आठ दिवसावर येवून ठेपली आहे. एकीकडे निवडणुकीची धामधूम तर दुसरीकडे दिवाळीची तयारी सुरू आहे. दिवाळीला लागणाऱ्या पणत्या,

विष्णू वाकडे, रामनगरदिवाळीसण अवघ्या आठ दिवसावर येवून ठेपली आहे. एकीकडे निवडणुकीची धामधूम तर दुसरीकडे दिवाळीची तयारी सुरू आहे. दिवाळीला लागणाऱ्या पणत्या, बोळके तयार करण्यास ग्रामीण भागातील कुंभारबांधव सध्या व्यस्त आहेत.आधुनिक युगात आता सर्वच काही रेडीमेड साहित्य मिळते. बाजारात तयार पणत्या दाखल झालेल्या आहेत. मात्र आजही मातीच्या पणत्या आणि बोळक्यांची मागणी मोठी आहे. त्यामुळे ग्रामीण भागात कुंभारदादा ते बनविण्यात व्यस्त आहेत. हातवन येथील भुजंग सोनगावकर यांचे अख्ये कुटुंबिय मागील महिनाभरापासून तयारीला लागले आहे. या बाबत बोलताना ते म्हणाले की, आमचा हा पारंपरिक व्यवसाय आहे. पूर्वी या व्यवसाच्या माध्यमातून वर्षभर उदरनिर्वाहची सोय होत, आता मात्र फक्त ठराविक काळातच हा व्यवसाय करावा लागत आहे. इतरवेळ जमेल ते काम करून उदरनिर्वाह करावा लागत आहे.दिवाळी, मकर संक्राती आणि उन्हाळ्यात लागणारे माठ असे ठराविक वेळेतच व्यवसाय चालत असल्याचे त्यांनी सांगितले.ग्रामीण उद्योगांना चालनापूर्वीचा पारंपारिक असलेला हा ग्रामीण उद्योग आताच्या आधुनिकतेमुळे कमी होत चालला आहे. आजही काही ठिकाणी ग्रामीण भागात हा उद्योग तग धरून आहे.अशा अनेक ग्रामीण पारंपारिक उद्योगाना चालना देण्यासाठी शासनाने प्रयत्न करावेत अशी अपेक्षाही सोनगावकर यांनी व्यक्त केली.