शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

सिडकोचे खरपुडीतूनही स्थलांतर होण्याची चिन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 01:18 IST

खरपुडी येथे या प्रकल्पासाठी जमीन संपादित करण्यात आली होती. मात्र, सिडको व्यवस्थापनाने हा प्रकल्प फिजिबल नसल्याचे कारण देत नव्याने सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतल्याने सिडको येथूनही दुसरीकडे जातो की, काय अशी चिन्ह निर्माण झाली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : गेल्या दहा वर्षापासून जालन्यातील सिडको प्रकल्पाचे भिजत घोंगडे कायम आहे. आता कुठे जालन्यापासून जवळच असलेल्या खरपुडी येथे या प्रकल्पासाठी जमीन संपादित करण्यात आली होती. मात्र, सिडको व्यवस्थापनाने हा प्रकल्प फिजिबल नसल्याचे कारण देत नव्याने सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतल्याने सिडको येथूनही दुसरीकडे जातो की, काय अशी चिन्ह निर्माण झाली आहेत.जालन्यात सिडकोचा प्रकल्प व्हावा म्हणून तत्कालिन नगरविकास राज्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रथम खादगाव परिसरात यासाठी ३०० एकर जागा संपादीत करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. काही शेतकऱ्यांच्या जमिनी संपादीत करून त्यांना मावेजा देण्यात आला होता. परंतु प्रदूषणाचे कारण पुढे करत येथून हा प्रकल्प खरपूडी येथे हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी पुढाकार घेतला होता. त्यानंतर परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करून त्यांना मावेजाचे वाटप करण्यात आले होते. दरम्यान आता जमिन संपादीत केल्यावर सिडकोने जवळपास महसूलकडे ७८ कोटी रूपये भरावेत असे सांगण्याात आले. परंतु ही रक्कम खूप मोठी होत असल्याचे सिडको प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे सर्वेक्षण परदेशातील वायएनके या कंपनीकडून केले जात असल्याचे सांगण्यात आले. हा प्रकल्प आता जामवाडी, अथवा समृध्दी महामार्गाजवळ होऊ शकतो.कानावर हात : अधिकाºयांकडून चुप्पीजालना शहरातील खरपुडी परिसरातील अनेक शेतक-यांची जमीन सिडकोने वर्षभरापूर्वीच संपादित केली आहे. यात यलो आणि ग्रीन झोनच्या शेतजमिनिच्या किमतीवरूनही शेतक-यांमध्ये नाराजी होती.यासंदर्भात औरंगाबाद येथील सिडकोचे प्रशासकीय अधिकारी मधुकर आर्दड यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी जालन्यातील या प्रकल्पा विषयी बोलणे टाळले. तसेच आपण बैठकीत असल्याचे सांगून नंतर संपर्क करतो, असेही सांगितले; परंतु नंतर त्यांच्याशी मोबाईलवरून संपर्क केला असता, त्यांनी प्रतिसाद न दिल्याने पुन्हा सिडको बाबत प्रश्नचिन्ह कायम आहे.

टॅग्स :cidcoसिडकोMigrationस्थलांतरण