शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

इस्कॉनतर्फे श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:05 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जालना : धर्माचा अधर्मावर, प्रकाशाचा अंधारावर आणि दहा प्रकारच्या असुरी प्रवृत्तींवर विजय म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जालना : धर्माचा अधर्मावर, प्रकाशाचा अंधारावर आणि दहा प्रकारच्या असुरी प्रवृत्तींवर विजय म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमी असून, श्रीकृष्ण भगवंताची सेवा हीच खरी परम सेवा आहे. तीच आपल्या उद्धाराचे साधन बनेल, असे प्रतिपादन रास गोविंद प्रभू यांनी कृष्ण जन्माष्टमी सोहळ्यात केले.

अंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संग ( इस्कॉन) तर्फे संपूर्ण जगात साजरी होत असलेली श्री कृष्ण जन्माष्टमी जालना शहरात तीन दिवस ऑनलाईन पद्धतीने उत्साह व भक्तिपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यात भागवत कथा, प्रवचन, श्लोक पठण, अभिषेक, महाआरती, भगवंताचे शृंगार, व्यंजनांचे भोग, या धार्मिक विधींसोबतच लहान मुले- मुलींसाठी चित्रकला, वेशभूषा, नाटिका, गायन स्पर्धा अशा भरगच्च कार्यक्रमांची रेलचेल होती.

रविवारी पहाटे पाच ते नऊपर्यंत भागवत कथा, शृंगार दर्शन, सायंकाळी चार ते सहा यावेळी श्रीमद् भागवतगीतेतील श्लोकांचे पठण करण्यात आले. सोमवारी सकाळी मंगल आरती, श्री कृष्णांवर आधारित कथा, भगवंताचे ऑनलाईन दर्शन, सायंकाळी एकशे आठ व्यंजनांचे भोग असलेले नैवेद्य अर्पण करून भजन, कीर्तन, रात्री बारा वाजता श्री कृष्ण जन्मोत्सवाची महाआरती करण्यात आली. रास गोविंद प्रभू यांनी प्रवचनात श्री कृष्ण भक्तीचे महत्त्व सांगून कृष्ण सेवेतच मानवाचा उद्धार असल्याचे निरूपण केले. मंगळवारी प्रभूपाद यांची गुरूपूजा, सायंकाळी नंदोत्सव व प्रभूपाद आविर्भाव महोत्सवात भाविकांनी प्रभूपादांच्या मार्गदर्शनामुळे जीवनात झालेल्या आमूलाग्र बदलांचे अनुभव कथन केले. महाप्रसादाने उत्सवाची सांगता झाली. यशस्वीतेसाठी गोविंद दत्त दास, अनया अग्रवाल, मुकेश अग्रवाल, किशोर तिवारी, ज्योती गोरंट्याल, मंगल मुंदडा, आदींनी परिश्रम घेतले.