शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळी योजनांचा आढावा घेणार शिवसेनेची समिती!

By admin | Updated: August 28, 2016 00:17 IST

जालना : चार वर्षांपासून दुष्काळाचा सामना करणाऱ्या जालना जिल्ह्यासह मराठवाड्यात राज्य सरकारने दुष्काळ निवारणार्थ विविध योजना जाहीर केल्या होत्या.

जालना : चार वर्षांपासून दुष्काळाचा सामना करणाऱ्या जालना जिल्ह्यासह मराठवाड्यात राज्य सरकारने दुष्काळ निवारणार्थ विविध योजना जाहीर केल्या होत्या. या योजनांच्या अंमलबजावणीसह इतर योजनांची माहिती शिवसेनेचे मंत्री, खासदार आणि आमदारांची समिती घेणार आहे. १ ते ३ सप्टेंबर या काळात हा आढावा घेण्यात येणार आहे. राज्य आणि केंद्रात सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेने दुष्काळीस्थिती शिवजलक्रांतीसह इतर योजना पक्षपातळीवर राबवून शेतकरी आणि लोकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर राज्य सरकारने दुष्काळ निर्मूलनार्थ विविध योजना जाहीर केल्या होत्या. याची अमलबजावणी योग्यरितीने झाली नसल्याची ओरड होत होती. त्यातच अनेक विद्यार्थ्यांना अद्याप शुल्क माफी देण्यात आलेली नाही. याचप्रमाणे इतर योजनांची अशीच अवस्था असल्याने जिल्ह्यातील विविध योजनांचा आढावा घेण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. त्यानुसार पक्षाचे मंत्री, खासदार आणि आमदारांची समिती हा आढावा घेणार आहे. यामध्ये राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, जिल्हा संपर्क नेते आ. विनोद घोसाळकर, खा. प्रताप जाधव, आ. सुरेश धानोरकर, आ. राजाभाऊ वाझे, आ. अनिल कदम, आ. योगेश घोलप, आ. अनिल बाबर, आ. शशिकांत खेडेकर यांचा समावेश राहणार आहे. १ ते ३ सप्टेंबर या काळात ही समिती जिल्ह्याचा दौरा करणार असून, जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांची बैठक घेऊन जिल्हा प्रशासनाच्या विविध योजनांच्या कामाचा आढावा घेणार आहे. दुष्काळ निवरणासाठी शिवसेनेने सुचविलेल्या उपाययोजना व मदत कार्याबद्दल सूचनांची अमलबजावणी शासकीय यंत्रणाकडून झाली अथवा नाही, शिवजलक्रांती योजनेतील कामांची सद्यस्थिती व जलसाठ्याची स्थिती, जनतेशी संवाद ही समिती साधणार आहे. (प्रतिनिधी) शिवसेनेच्यावतीने दुष्काळात राबविण्यात आलेल्या शिवजलक्रांती अभियानातून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे करण्यात आली. यात प्रामुख्याने शिवकालीन बंधाऱ्यांचे पुनरुज्जीवन, नदी तसेच नाल्यांचे खोलीकरण करण्यात आले. या शिवजलक्रांती अभियानामुळे बंधाऱ्यांत मुबलक असा पाणीसाठा झालेला आहे. शिवजलक्रांतीमुळे जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेतीला या पाण्याचा लाभ होईल. शिवाय विहिरी, कुपनलिकांच्या पाणीपातळीतही समाधानकारक वाढ झाली आहे. जिल्ह्यात दुष्काळस्थिती शिवजलक्रांती योजनेद्वारे शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न पक्षाच्या माध्यमातून केला. त्यामुळे अनेक गावांचा पाण्याचा प्रश्न बऱ्याच अंशी सुटला आहे. या योजनेसह राज्य शासनाने जाहीर केलेल्या योजनांचा आढावा शिवसेनेची मंत्री, खासदार आणि आमदारांची समिती घेणार आहे. - अर्जुन खोतकर, राज्यमंत्री (दुग्धविकास, वस्त्रोद्योग व मत्स्यविकास) दुष्काळ निर्मूलनार्थ राज्य सरकारने अनेक योजना जाहीर केल्या. मात्र, त्याची अंमलबजावणी योग्य रित्या झाली नसल्याची सामान्यांची ओरड आहे. तसेच इतर लोककल्याणकारी योजनांची हीच अवस्था आहे. म्हणूनच पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार शिवसेनेच्या समितीकडून हा आढावा घेण्यात येणार आहे. - भास्कर अंबेकर, जिल्हाप्रमुख, शिवसेना, जालना.