शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
2
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
3
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
4
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
5
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
6
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
7
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
8
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
9
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
10
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
11
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
12
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
13
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
14
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
15
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
16
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
17
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
18
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
19
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
20
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

साहित्य परिषदेचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभ उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:30 IST

यावेळी प्रा.डॉ. बी.जी. श्रीरामे व अ‍ॅड. भारती रोकडे यांना सामाजिक क्षेत्रात भरीव कार्य केल्याबद्दल जाणीव अस्मितेची साहित्य परिषदेकडून सन्मानपत्र, ...

यावेळी प्रा.डॉ. बी.जी. श्रीरामे व अ‍ॅड. भारती रोकडे यांना सामाजिक क्षेत्रात भरीव कार्य केल्याबद्दल जाणीव अस्मितेची साहित्य परिषदेकडून सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल व पुष्पहार देऊन प्रमुख पाहुणे राम गायकवाड यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी प्रा. डॉ. बी.जी. श्रीरामे यांनी सत्काराला उत्तर देत असताना शेवटी जगाचा पोशिंदा असलेला बळीराजा यांच्या जीवनावरची ‘पेरणी’ नावाची एक कविता व महामानवांच्या जीवनावरची ‘गाणं भिमाचं’ नावाची एक कविता अशा दोन कविता त्यांनी सादर केल्या.

यावेळी राम गायकवाड म्हणाले की, गंगाधर पानतावणे यांच्या निधनानंतर राज्यातील परिवर्तनवादी साहित्यिकांना एक अस्मितेचे विचारपीठ राहिले नाही, ती उणीव लक्षात घेऊनच आम्ही जाणीव अस्मितेची साहित्य परिषद आपल्या राज्यात स्थापन केली आहे. या साहित्य परिषदेच्यावतीने राज्यस्तरीय साहित्य संमेलने प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या शहरात भरवली जाणार आहेत. नव्या व जुन्या परिवर्तनवादी सर्व जाती-धर्मातील साहित्यिकांना हक्काचे हे बॅनर झाल्याने प्रत्येक जिल्ह्यात शाखा होत आहे, असेही ते म्हणाले. याप्रसंगी लेखक डॉ. जानराव, कवी डी.के. शेख, पंडित कांबळे, प्रा. शिवाजी गायकवाड, जयराज खुणे, रवींद्र शिंदे, लेखक तात्यासाहेब माने, प्रा. महेंद्र चंदनशिवे आदी साहित्यिक उपस्थित होते.