जालना : कोविड रूग्णालयात उपचार घेणा-या एकाचा शुक्रवारी मृत्यू झाला. तर शुक्रवारीच ६१ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. १६ जणांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. जिल्ह्यातील बाधितांची संख्या १४ हजार ३६२ वर गेली असून, आजवर ३७७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत १३ हजार ६४४ जणांनी कोरोनावर मात केली आहे.
जालना शहरातील २०, तालुक्यातील नागेवाडी येथील एकास कोरोनाची लागण झाली. मंठा तालुक्यातील पांगरी गोसावी २, रामतीर्थ १, जयपूर येथील एकास कोरोनाची बाधा झाली. अंबड तालुक्यातील लालवाडी १, अलमगाव १, पारडा २, हरतखेडा १, एकलहेरा १, बोरसोडा येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. जाफराबाद तालुक्यातील बोंदनखेडा १, शिराळा १, सावरखेडा येथील एकास कोरोनाची लागण झाली आहे. भोकरदन तालुक्यातील जयदेववाडी २३ तर बुलडाणा जिल्ह्यातील तिघांना कोरोनाची बाधा झाली.