शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

घनसावंगी तालुक्यात पावसाने ओलांडली सरासरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:30 IST

घनसावंगी : घनसावंगी तालुक्यात जूनच्या सुरुवातीपासूनच जोरदार पाऊस होत आहे. यामुळे सप्टेंबर महिन्यातच पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली आहे. ...

घनसावंगी : घनसावंगी तालुक्यात जूनच्या सुरुवातीपासूनच जोरदार पाऊस होत आहे. यामुळे सप्टेंबर महिन्यातच पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली आहे. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान होत आहे.

घनसावंगी तालुक्यात यंदा चांगला पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनीही लवकरच पेरणी उरकली होती. घनसावंगी तालुक्यात यंदा ८२ हजार ५६७ हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आली आहे. मात्र, तालुक्यातील सातही मंडलांत पडलेल्या जोरदार पावसामुळे पिकांचे नुकसान होत आहे.

आतापर्यंत सर्वाधिक पावसाची नोंद रांजणी मंडलात झाली असून, या मंडलात ८९३.६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. घनसावंगी मंडल दुसऱ्या क्रमांकावर असून, घनसावंगी मंडलात ८७५.५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. अंतरवाली मंडलात ८१०.८ मि.मी., राणी उंचेगाव मंडलात ७५१.०५ मि.मी., तीर्थपुरी मंडलात ७३९.०५ मि.मी., कुंभार पिंपळगाव मंडलात ७६०.६ मि.मी., तर जांबसमर्थ मंडलात ७२२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

घनसावंगी तालुक्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत वार्षिक ६३८.४० मि.मी. पाऊस अपेक्षित आहे. मात्र, ही अपेक्षित सरासरी यंदा सप्टेंबरच्या सुरुवातीलाच ओलांडली असून, आतापर्यंत तालुक्यात सरासरी ७९३.२० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी या वेळेपर्यंत ६१० मि.मी. पावसाची नोंद झाली होती.

अतिवृष्टीमुळे बाणेगाव शिवारातील शेतांना तलावाचे स्वरूप आले आहे, तर मंगरुळ येथील २०० हेक्टर क्षेत्रावरील पिकाला फटका बसला आहे. शिवाय गंगाकाठच्या उसाचेही मोठे नुकसान झाले आहे. घनसावंगी शहरासह, बहीरगड, बोलेगाव, भद्रेगाव, रामगव्हाण, तणवाडी, राहेरा, देवहिवहरा, एकलेहरा, तीर्थपुरी, बोडक्या, खडका, मांदळा, म. चिंचोली, कु. पिंपळगाव, सिंदखेड, जांबसमर्थ, राजाटाकळी, घोन्सी, पारडगाव, आवलगाव, राजेगाव, रांजणी, राणी उंचेगाव, गुरपिंपरी, बोलेगाव, मंगुजळगावसह दुधना तिरावरील गावांनाही अतिवृष्टीचा मोठा फटका बसला असून, सर्वच पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरले आहेत.

पंचनामे करण्याची मागणी

तलाव क्षेत्रातील पिके पूर्णतः पाण्यात बुडाली असून, पाच हजार हेक्टरवरील कापसाचे व चार हजार हेक्टर क्षेत्रावरील मुगाच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच सोयाबीनच्या पिकालाही याचा फटका बसला आहे. शिवाय तुरीचे पीक पाण्याखाली बुडाल्याने उभे पीक जागीच सोडावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.