शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

मालमत्ता सर्व्हेक्षणाचा घोळ कायम...!

By admin | Updated: June 23, 2016 01:06 IST

जालना : गत काही वर्षांत शहरात नवीन वसाहतींची भर पडली आहे. मालमत्ता ८० हजारांवर गेल्या आहेत. एवढ्या मालमत्ताधारकांना

जालना : गत काही वर्षांत शहरात नवीन वसाहतींची भर पडली आहे. मालमत्ता ८० हजारांवर गेल्या आहेत. एवढ्या मालमत्ताधारकांना पालिका मूलभूत सुविधा देण्यास असमर्थ ठरत आहे. तत्कालीन मालमत्ता सर्व्हेक्षण एजन्सीने तीन वर्षांत कोट्यवधींचा चुना लावला आहे. एकूणच नवीन व जुन्या सर्व्हेक्षण एजन्सींचा घोळ कायम आहे. पालिकेच्या म्हणण्यानुसार शहरात ८० हजारांवर मालमत्ता असाव्यात. गत तीन वर्षांपूर्वी नागपूर येथील डबरासी या एजन्सीला सर्व्हेक्षणाचे काम देण्यात आले होते. या एजन्सीने मालमत्तांचे सर्व्हेक्षण बोगस केल्याचा आरोप आहे. यातच संबंधित एजन्सीच्या कर्मचाऱ्यांनी मालमत्तांच्या आखीव पत्रिकेत बदल करून परस्पर लाखो रूपये उचलून पालिकेचे अंदाजे २४ कोटी रूपयांचे नुकसान केले. यामुळे मालमत्ताधारकांकडून मिळणार करही पालिकेला मिळाला नाही. मिळाला तरी अल्प प्रमाणात. या कामांत पालिकेच्या काही कर्मचाऱ्यांचेही हात ओले झाल्याचे चर्चा आहे. डबरासी चुना लावत असल्याची पालिकेला उपरती झाल्यावर पालिकेने संबंधित एजन्सीचे काम थांबविले. काही दिवसांपूर्वी कोलब्रो या एजन्सीला पुन्हा नव्याने सर्व्हेक्षणाचे काम देण्यात आले असून, ही एजन्सी अत्याधुनिक उपकरणांद्वारे सर्व्हेक्षण करणार असल्याचे मुख्याधिकारी यांनी सांगितले. जुन्या एजन्सीने केलेला सर्व्हे, मोजलेल्या मालमत्ता व आता नवीन एजन्सीचे सर्व्हेक्षण यात मोठे गौडबंगाल आहे. डबरासीने तीन वर्षांत केलेल्या सर्व्हेक्षणाच्या नोंदी कोठे आहेत हा प्रश्न उपस्थित होतो.