शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

इंधन निर्भरता कमी करण्यासाठी सौरऊर्जा वापरास देशात प्रोत्साहन

By admin | Updated: June 7, 2017 00:24 IST

जालना : आखाती राष्ट्रातून कच्च्या तेलाची आवक कमी करण्यासाठी देशांतर्गत सौरऊर्जेच्या वापरास प्रोत्साहन देण्यात येत असल्याची माहिती केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंंद्र प्रधान यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : आखाती राष्ट्रातून कच्च्या तेलाची आवक कमी करण्यासाठी देशांतर्गत सौरऊर्जेच्या वापरास प्रोत्साहन देण्यात येत असल्याची माहिती केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंंद्र प्रधान यांनी मंगळवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.प्रधान म्हणाले, की साठ वर्षांत १४ कोटी कुटुंबाकडे एलपीएजी जोडण्या होत्या. यात गत तीन वर्षात सात कोटींनी वाढ झाली आहे. भाजप सरकारने एलपीजी गॅस वितरण प्रणालीत अधिकाधिक पारदर्शकता आणली. ग्रामीण भागातील महिलांना उज्ज्वला योजनेंतर्गत कमी दरात गॅस उपलब्ध करून दिला. तसेच गॅस अनुदान सोडण्याचे आवाहन केले. यास सर्व स्तरातून चांगला प्रतिसाद मिळाल्याने हे शक्य झाले. आतापर्यंत एक कोटी नागरिकांनी गॅस अनुदान नाकारले आहे. जालन्यातूनही यास चांगला प्रतिसाद मिळाला. गॅस अनुदान सोडणारे जालन्यातील ट्रक चालक शेख गफ्फार व एका सेवानिवृत्त शिक्षकास प्रधान यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. अनेक ठिकाणी घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर होतो याबाबत विचारले असता, व्यावसायिक गॅसच्या किमती कमी झाल्यास हे प्रमाण कमी होईल, असे त्यांनी सांगितले. भारत सरकार किती दिवस इतर देशातून कच्च्या तेलाची आयात करणार याबाबत स्पष्टीकरण देताना आपल्याकडे कच्च्या तेलाची नैसर्गिक उपलब्धता नाही. त्यामुळे इतर देशांतून तेल आयात करावेच लागेल. मात्र, हे प्रमाण कमी करण्यासाठी सरकार वेगवेगळ्या उपाययोजना करत असल्याचे ते म्हणाले. पत्रकार परिषदेस भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, पालकमंत्री बबनराव लोणीकर, आ. संतोष दानवे, आ. नारायण कुचे, भास्कर दानवे, माजी आ. अरविंद चव्हाण, उद्योगपती घनश्याम गोयल, विलास खरात, किशोर अग्रवाल रामेश्वर भांदरगे आदी उपस्थित होते.